वाघाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

व्याहाळ उपक्षेत्रा अंतर्गत उपरी येथील घटना

सावली (प्रतिनिधी) : स्वतःचे जनावरे चराईसाठी घेवुन गेलेल्या शेतकÚयांवर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून जखमी केल्यची घटना सावली वनपरिक्षेत्रातील उपक्षेत्र व्याहाळ येथील बांध तलावकडे जाणाÚया जंगल परिसरातील कक्ष क्रं. 198 मध्ये घडली. खुशाल कवडु शेटे वय 50 वर्षे रा. उपरी असे वाघाच्या हल्लात जखमी झालेल्या शेतकÚयांचे नांव आहे.

सावली वनपरिक्षेत्र अधिनस्त असलेल्या उपक्षेत्र व्याहाळ अंतर्गत परिसरात मोठ्या प्रमाणात छूडपी जंगल आहे या परिसरातील हजारो हेक्टर शेत जमीनी जंगल परिसरा लगत आहे सोबतच या भागात मोठ्या प्रमाणात वाघाचा धामाकुळ असून वाघाची नेहमीची दहशत आहे यापरिसरात खुशाल शेट्टे हे पाळीव जनावरे घेवुन बांध तलावकडे जाणाÚया जंगल परिसरातील कक्ष क्रं. 198 लगत चराई करीत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने म्हशीवर हल्ला केला, दरम्यान चवताळलेल्या म्हशीने इतरत्र धाव घेतल्याने वाघाने म्हशी घेवुन आलेल्या शेतकÚयावर झड़प घेतल्याने शेतकÚयाने आरडाओरड केल्याने वाघाने तिथुन पळ काढला, शेतकÚयांचा आवाज ऐकुण सर्पणासाठी आलेल्या नागरीकांनी घटनास्थळाकडे धाव घेतले, यावेळी सदर शेतकरी जखमी झाल्याने त्याला गडचिरोली येथील सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले आहे

धान पिकाचा हंगाम सुरू असतानाही नागरीकांना वाघाच्या दहशतीत हंगामातील कामे पुर्ण करावा लागत आहे यामुळे वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी नागरीकांनी केली आहे.