सावली (प्रतिनिधी) : मच्छी पकडण्यासाठी गेलेल्या मच्छीमाराचा तलावात बुडुन मृत्यु झाल्याची घटना मंगळवारी (दि. 1 नोव्हेंबर) रोजी दुपारच्या सुमारास तालुक्यातील केरोडा येथे घडली. सुखदेव बापूजी राऊत वय 64 वर्षे असे मृतकाचे नाव आहे.
केरोडा येथील वाल्मीकी संस्थेचे सभासद असलेले सुखदेव बापुजी राऊत हे मच्छी पकडण्यासाठी केरोडा येथील तलावावर आपल्या संस्थेच्या सभासदासह गेले होते. मच्छीमारी सुरू असतानाच तलावातील मोठ्या खड्यात त्यांचा तोल गेल्याने ते पडले. सोबत असलेल्या साथीदारांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु पाणी जास्त असल्याने त्यांना वाचविण्यात अपयश आले.
सुखदेव राऊत यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व मुलगी असा आप्त परिवार आहे. सदर घटनेची माहिती सावली पोलिसांना देण्यात आली. पोलीसानी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरिय तपासणी करीता सावली ग्रामीण रुग्णालयात पाठविला. पुढील तपास सावली पोलीस करीत आहेत.