मुख्यकार्यपालन अधिकारी विवेक जॉन्सन यांची कोसंबी ग्राम पंचायतच्या विविध उपक्रमाला भेट

ग्राम पंचायतच्या आगळया वेगळया उपक्रमाची केली स्तुती

मूल (प्रतिनिधी) : ग्राम स्वच्छ स्पर्धेत उत्स्फुर्तपणे सहभागी होवुन जिल्हयात कोसंबी गावाचे नांव सुवर्ण अक्षरात कोरलेल्या ग्राम पंचायत कोसंबीला जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यपालन अधिकारी विवेक जॉन्सन यांनी बुधवार (ता. 2 नोव्हेंबर) रोजी भेट देवुन ग्राम पंचायतच्या विविध उपक्रमालाही भेट देवुन केलेल्या आगळयावेगळया उपक्रमाची स्तुती केली.

यावेळी मूल पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी देव घुनावत, आदर्श ग्राम पंचायत कोसंबीचे सरपंच रवींद्र किसन कामडी, मूल पंचायत समितीचे विस्तार अधिकारी जीवन प्रधान, संजय पुप्पलवार, कृषी अधिकारी सुनिल कारडवार, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता गोंगले, सहा. अभियंता बिसेन, बघेले गटशिक्षणाधिकारी खांडरे, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचे तालुका व्यवस्थापक सतिश वनकर, प्रज्ञामित्र नगराळ, बोरकर, कोसंबी ग्राम पंचायचे सचिव सुरज प्रकाश आकनपल्लीवार आदी उपस्थित होते.

यावेळी मुख्यकार्यपालन अधिकारी विवेक जॉन्सन यांनी आंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा आणि स्वच्छ ग्राम स्पर्धेत केलेल्या उपक्रमाची पाहणी केली. आणि गावविकासाबाबत अधिकाÚयांशी चर्चा केली.

यावेळी उपसरपंच सारिका गेडाम, सदस्य चंदाताई कामडी, अरुणा वाढई, रोषनी मोहुर्ले महाकाली महिला ग्रामसंघ कोसंबी चे अध्यक्ष वेदिका सोनुले, गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष सुभाष गुरनुले महाराज, पोलीस पाटील अर्चना मोर्हुे, तंटामुक्तीचे अध्यक्ष प्रभाकर चौधरी, यासह मोठया प्रमाणावर गावकरी उपस्थित होते.