8 नोव्हेंबर रोजी निःशुल्क मोतीबिंदू नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

समता फाउंडेशन मुंबई व सक्षम बहुउद्देशीय ग्रामविकास संस्थेचा पुढाकार

मूल (प्रतिनिधी) : राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत समता फाउंडेशन मुंबई, जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर तथा सक्षम बहुउद्देशीय ग्रामविकास संस्था भेजगाव व पोलीस पाटील संघटना मुल तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने 8 नोव्हेंबर रोजी निशुल्क मोतीबिंदू नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन तालुक्यतील भेजगांव येथील शरदचंद्र पवार विद्यालयाच्या प्रागणात करण्यात आले आहे.

शिबिरामध्ये सहभागी झालेल्या रुग्णांची मोफत तपासणी आणि योग्य सल्ला मार्गदर्शन करण्यात येणार आहे. मोतीबिंदू असलेल्या रुग्णांची जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे शस्त्रक्रिया केली जाणार असून मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांची ने आण राहण्याची जीवनाची मोफत सोय करण्यात येणार आहे. शिबिरात मोतीबिंदू आढळलेल्या रुग्णांना ऑपरेशन साठी 12 नोव्हेंबरला चंद्रपूर येथे नेण्यात येणार आहे.

सक्षम बहुउद्देशीय ग्रामविकास संस्था ही जिल्हा पुरस्कार प्राप्त संस्था असून ग्रामीण भागात नागरिकांच्या उत्थानासाठी विविध समाज उपयोगी उपक्रम राबवत असते. संस्था मागील बारा वर्षापासून कार्यरत आहे. संस्थेच्या वतीने मंगळवारला आयोजित केलेल्या निशुल्क मोतीबिंदू नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचा मूल तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे व रुग्णांनी तपासणीसाठी येताना राशन कार्ड व आधार कार्डची झेरॉक्स सोबत आणण्याचे आव्हान सक्षम बहुउद्देशीय ग्रामविकास संस्थेचे अध्यक्ष शशिकांत गणवीर यांनी केले आहे.