वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

ब्रम्हपुरी (प्रतिनिधी) : शेतीचे काम करण्यासाठी गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना तालुक्यातील तोरगांव (बुज) शेतशिवारात गुरूवारी (ता. 3 नोव्हेंबर) रोजी घडली. जाईबाई तुकाराम तोंडरे वय 55 वर्षे असे वाघाच्या हल्लात ठार झालेल्या महिलेचे नांव आहे.

ब्रम्हपुरी तालुक्यात मागील काही महिण्यापासुन वाघाचे हल्ले नेहमी होत आहे. गुरूवारी तालुक्यातील तोरगांव (बुज) येथील शेतात धान पिकाचे सरवा करण्यासाठी जाईबाई तुकाराम तोंडरे वय 55 वर्षे हया गेल्या होत्या. दरम्यान दबा धरून बसलेल्या वाघाने तिच्यावर हल्ला करून जागीच ठार केले. घटनास्थळाला वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी भेट देवुन पंचनामा केला.

त्यांचा पश्चात पती, मुलगा व तीन मुली आहेत. वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा अन्यथा तिव्र आंदोलन करून अशा इशारा नागरीकांनी दिला.