दुचाकी स्वाराची समोरासमोर धडक एक ठार तर दोन जण जखमी

मानोरा फाट्या जवळील घटना

अतुल कोल्हे भद्रावती :  माजरी वरून भद्रावतीकडे येत असताना त्याच रस्त्याने रॉंग साईडने येणाऱ्या दुचाकी स्वारांनी समोरासमोर धडक दिली यात दुचाकीस्वार पतीचा मृत्यू झाला तर पत्नी जखमी असून यातील समोरून धडक देणारा दुचाकी स्वार सुद्धा गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी पाचच्या दरम्यान मानोरा फाट्याजवळ घडली.

डोमाजी गोविंद टोंगे वय ७० वर्ष राहणार किल्ला वार्ड असे मृतकाचे नाव आहे. तर पत्नि तुळजाबाई टोंगे वय ६५ वर्ष व धडक देणारा दुचाकी स्वार मंगेश घनश्याम मिलमिले २४ वर्ष राहणार डोंगरगाव असे गंभीर जखमीचे नाव आहे डोमाजी हे दुचाकी एमएच ३४ बीएन ८३०१ नी माजरी वरून भद्रावतीकडे येत असताना रांग साईडने येणारी दुचाकी क्रमांक एम एच २९ ए एफ २०९९ ने धडक दिली धडक एवढी मोठी होती की दोन्ही दुचाकी वाहनातील समोरील चक्क्याचे टायर बाहेर निघाले या अपघातात डोमाजी यांचा जागीच मृत्यू झाला जखमी ना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

या आठवड्यातील हा तिसरा अपघात असून शहरात अपघाताचे सत्र वाढले आहे या अपघातात चौघांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहे.