दोन अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण : तिन आरोपीना अटक

पॉक्सोंसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल

सुधाकर दुधे, सावली
सावली तालुक्यातील वेगवेगळ्या गावात मागील चार दिवसात विनयभंग आणि बलात्काराच्या तीन घटना घडल्याने सावली तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे

तालुक्यातील हिरापूर येथील ५० वर्षीय धनराज पतरु गोहणे या नाराधमाने एका सहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीच्या अंतवस्त्रात हात घालून विनयभंग केल्याची तक्रार पीडितेच्या पालकांनी केल्याने त्यांच्यावर भांदवी ३५४ व पॉक्सोंअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीची कारागृहात रवानगी करण्यात आली. दुसÚया घटनेत सावली तालुक्यातीलच व्याहाड खुर्द येथील अतुल रामनाथ मानकर वय 19 वर्षे या आरोपीने दुसऱ्या गावातील १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून गर्भवती केले मात्र लग्नास नकार दिल्याने पालकांच्या तक्रारीवरून भादंवि ३७६ अन्वये तथा पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे . आरोपीला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. तिसÚया घटनेत तालुक्यातील सोनापूर येथील किशोर ऋषी मेश्राम वय 25 वर्षे या युवकाने एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केल. त्यात ती गर्भवती झाली. मात्र लग्नास नकार दिल्याने पालकांच्या तक्रारीवरून भादंवि ३७६ व पोक्सो अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करून पोलीस कोठडीत ठेवण्यात आले.

सदर घटनेचा पुढील तपास भरोसा सेलच्या पोलीस उपनिरीक्षक अश्विनी वाकडे व नायक पोलीस शिपाई विनोद वाघमारे करीत आहे.