अखेर ब्रम्हपूरीतील तो ” नरभक्षक ” वाघ जेरबंद

ब्रह्मपुरी (प्रतिनिधी) : ब्रम्हपुरी वनविभागातील उत्तर ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्रामध्ये मागील काही दिवसात पट्टेदार वाघाने ४ जनांचा बळी घेतला होता. मनुष्यहानीमध्ये कॅमेरा ट्रॅप छायाचित्रावरून S A M – 2 या नर वाघाचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले होते.

या वाघाचा शेतशिवार परिसरात नियमित वावर असल्याने व मानवी जीवीतास धोका कायम असल्याने SAM-II वाघास (नर) जेरबंद करण्याची कार्यवाही सुरू केली असता सायगाटा नियत क्षेत्रांत शुटरच्या सहाय्याने डार्टने बेशुद्ध केल्यानंत्तर पिजऱ्यात जेरबंद करण्यास वनविभागाला यश आले.

सदरची कार्यवाही ब्रम्हपूरी उपवनसंरक्षक दिपेश मल्होत्रा यांचे मार्गदर्शनाखाली एम बी. चोपडे सहायक वनसंरक्षक (प्रादे व वन्य) ब्रम्हपुरी, एम. बी. गायकवाड वनक्षेत्रपाल उत्तर ब्रम्हपुरी, श्री आर. डी. शेंडे, वनक्षेत्रपाल दक्षिण ब्रम्हपुरी यांच्या चमूने केली.

जेरबंद करण्यात आलेल्या SAM-H वाघ (नर) चे वय अंदाजे दोन ते अडीच वर्षे असून सदर वाघाची वैद्यकिय तपासणी केल्यानंतर त्याला ट्रांझिट ट्रिटमेंट सेंटर, चंद्रपूर येथे हलविण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते.