कोंबड बाजारावर मूल पोलीसांची धाड

2 लाख 15 हजाराचा मुद्देमाल जप्त

मूल (प्रतिनिधी) : कोंबडयांची झुंज लढवुन पैशाची बाजी लावुन हारजितचा जुगार खेळत असताना मूल पोलीसांनी धाड टाकुन सुमारे 2 लाख 15 हजाराचा मुद्देमाल जप्त केल्याची घटना मूल तालुक्यातील मौजा येरगांव शेतशिवरात (दि. 9 नोव्हेंबर) घडली. मूल पोलीसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.

मूल पोलीस स्टेशनच्या पथकाने मूल परिसरात जुगार रेड पेट्रोलींग करीत असताना मौजा येरगाव येथील शेतशिवरात उमा नदीच्या काळावर अवैधरित्या कोंबडयाची झंुज लढवुन पैशाची बाजी लावुन जुगार खेळणाÚया दिलीप डोनुजी निकुरे वय 52 वर्षे रा. चिमढा, पुनेश्वर कवडु नागोसे वय 55 वर्षे रा. चितेगांव, प्रमोद हरिश्चंद्र गावतुरे वय 38 वर्षे रा. हळदी, सुधीर मधुकर मुनगंटीवार वय 32 वर्षे रा. हळदी, मारोती चरणदास पिंपळे वय 25 वर्षे रा हळदी, इश्वर पुरूषोत्तम कोठारे वय 26 रा. हळदी जुगार खेळताना मिळुन आले. त्यांच्या ताब्यातील 3 कोंबडे, 2700 रूपये रोख, 4 मोबाईल, 4 मोटार सायकल असा एकुण 2 लाख 15 हजार 400 रूपयाचा माल जप्त केला असुन गुन्हा दाखल केला आहे.

सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी मल्लीकार्जुन इंगळे, पोलीस निरीक्षक सतिशसिंह राजपुत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पुरूषोत्तम राठोड, नापोअं चिमाजी देवकते, पो. अं. श्रावण कुत्तरमारे, शफीक शेख, संजय जुमनाके, स्वप्नील खोब्रागडे यांनी केली आहे.