राष्ट्राच्या बचावासाठी तृतीयपंथींनी घेतली हाती मशाल

खासदार बाळू धानोरकर यांचा भारत जोडो यात्रा जनजागृती

चंद्रपूर (प्रतिनिधी) : केंद्रात भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्यापासून भारत देश अधोगतीकडे वाटचाल करीत आहे. समाजात समाजामध्ये फूट पाडली जात आहे. या देशाला विखुरण्यापासून बचाव करण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात भारत जोडो यात्रा सुरू आहे. त्याला देशभरातून समर्थन मिळत असून, चंद्रपूर शहरातही मशाल रॅली काढून पाठिंबा दर्शविण्यात आला. चंद्रपूर शहरातील गांधी चौक येथे तृतीयपंथींच्या हस्ते मशाल पेटवून रॅलीला प्रारंभ करण्यात आला.