सलीम पठाण यांचे निधन

मूल (प्रतिनिधी) : येथील वॉर्ड क्र.11 मधील राहिवासी सलीम अब्दुल्लाखा पठाण वय 54 वर्षं यांचे रात्रौ 1.30 वाजता दरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

येथील सिद्धिविनायक गणेश मंडळाचे संस्थापक सदस्य असलेले सलीम पठाण यांना रात्रौच्या दरम्यान वेदना होत असल्याने कुटुंबियानी त्यांना मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले होते. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करुन मृत घोषित केले.

अतिशय मनमिळावू व्यक्तिमत्व असलेल्या सलीम पठाण यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे.