बेलदार समाज संघटनेच्या महिलांची सभा संपन्न

अभिजीत मुप्पीडवार अध्यक्षपदी, प्रणाली ईरटवार महिला अध्यक्षपदी निवड

सिंदेवाही (प्रतिनिधी) : विदर्भ बेलदार व तत्सम जमाती समाज संघटना मुख्यालय चंद्रपुर जिल्हा शाखा चंद्रपुरच्या वतिने 21 व 22 जानेवारी 2023 रोजी नियोजीत राज्यस्तरीय अधिवेशन, सांस्कृतिक स्पर्धा व उप वधू-वर परिचय मेळाव्याचे प्रचार व प्रसार नियोजन सभेचे आयोजन सिंदेवाही येथील नानाजी ईरटवार यांचे घरी नुकतेच घेण्यात आले.

सभेच्या अध्यक्षस्थानी बेलदार समाज संघटना चंद्रपूर शहर सचिव आरती अंकलवार होत्या. यावेळी निकिता कन्नमवार, मनिषा (नागमणी) कन्नमवार, दिपाली बंडीबार उपाध्यक्ष चंद्रपूर शहर यांचे मार्गदर्शनात व सिंदेवाही येथील श्रीमती शितल ईरटवार, वर्षाताई मुप्पीडवार, कोमल गूज्जनवार श्रीमती मंगला ननेवार उपस्थित होत्या.

चंद्रपूर येथे होणाÚया बेलदार समाज संघटनेच्या अधिवेशनासाठी सिंदेवाही तालुकातील मयुरी नन्नेवार, वैशाली ईरटवार, कल्याणी मुप्पीडवार, अमृता महाजनवार यांनी सहभागी होवुन प्रचार व प्रसार करण्यासाठी पुढाकार घेवुन सभेच्या आयोजनाची जबाबदारी पार पाडली.

बेलदार समाज संघटनेच्या झालेल्या पुरूष कार्यकारणीमध्ये अभिजीत मुप्पीडवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. तर शनिवार पार पडलेल्या सभेत महिला कार्यकारणी गठीत करण्याचे संपुर्ण अधिकारी प्रणाली ईरटवार अध्यक्ष व सचिव रागीणी गोर्लावार सचिव यांना देण्यात आले आहे.

सभेचे संचालन कालिंदी रेगुलवार यांनी केले तर उपस्थितांचे आभार वैशाली इरटवार यांनी मानले. यावेळी संगीता ईरटवार, ज्योती नलावार, पूजा जट्टलवार, कोमल गुज्जनवार, सावित्री जट्टलवार यांचेसह समाजातील महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.