चिमूर (प्रतिनिधी): येथील महाकाली नगरीतील वास्तव्यास असलेले विठ्ठल धोंडबाजी नन्नावरे (६५) यांनी महाकाली नगरीतील खेळाचे मैदानावर रविवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली.
मृतक विठ्ठल यांना मागील सहा महिन्यांपासून कॅन्सर झाला होता. त्यामुळे त्यांना खूप त्रास होत असल्याने या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती मृतकाचा मुलगा सुनील याने पोलिसांना दिलेल्या बयानात दिली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय, चिमूर येथे पाठविले. पुढील तपास पोलीस निरीक्षक मनोज गभणे यांच्या मार्गदर्शनात अलीम शेख, भारत पुसांडे करीत आहेत.