बायपास रस्त्याचे काम सुरू करून मालधक्काच्या कामाला सुरूवात करा

माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांच्या नेतृत्वात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे निवेदन

मूल (प्रतिनिधी) : मूल शहरातील बायपास रस्त्याचे काम सुरू करून मालधक्काचे कामाला सुरूवात करण्यात यावे यासह चंद्रपूर जिल्हयातील मच्छीमारांचा प्रश्न, वाघ व रानडुक्करांचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावे यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांना माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.

राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी शिष्टमंडळाने भेट घेवुन सदर मागणीचे निवेदन रविवारी देण्यात आले. यावेळी राजोली येथील तलावाच्या दुरूस्ती करीता निधी मंजुर करण्याबाबतही निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हयातील शेतकरी आणि मच्छीमार बांधवांचे तिन शिष्टमंडळानी निवेदन दिले. सदर निवेदनासंदर्भात लवकरच मंत्रालयात बैठक आयोजीत करून सर्व विषय सोडविण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला दिले.

यावेळी भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष अविनाश जगताप, माजी नगरसेवक महेंद्र करकाडे, मूल पंचायत समितीचे माजी उपसभापती गजानन वल्केवार, मूल नगर पालीकेचे माजी उपाध्यक्ष अनिल संतोषवार, मारोडाचे सरपंच भिकारू शेन्डे, भाजपा कार्यकर्ते दादाजी येरणे, लोकनाथ नर्मलवार, भगवान ढोरे, विपीन भालेराव, गुड्डु हेडावू, साहील येनगंटिवार, माजी नगरसेवक विनोद सिडाम, आकाश पाटील मारकवार, अविनाश वरगंटीवार, कवडुजी कोल्हे, जितु टिंगुसले व अनेक मच्छीमार बांधव उपस्थित होते.