सत्यशोधक दिवसानिमीत्य मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

मूल (प्रतिनिधी) : तालुक्यातील गाडीसुर्ला येतील सोनेरी ध्येय बहूउददेशिय संस्थाच्या वतीने १३ नोव्हेंबर  रोजी राजश्री शाहू महाराज कनिष्ठ विद्यालय गडीसुर्ला येथे प्रसिद्ध वक्ते शिवश्री डाँ समीर कदम यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये मार्गदर्शन कार्यक्रम करण्यात आला.

या कार्यक्रमाचे उदघाटक. नागपूर येथील इजी. राहुल वाढई यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी
रमेश निकुरे होते. विशेष अतिथी म्हणून नंदाजी शेंडे, पुंडलिकराव निकुरे,  प्राचार्य घोगडे, प्रा. मालेकर,  तुकारामजी वाढई, दीपकजी ठाकरे, लालाजी ढोले उपस्थित होते.

तात्यासाहेब यांनी त्याच्या जीवनामध्ये बहुजन समाजासाठी प्रयत्न केलेले होते, ते यावेळी डॉ. कदम यांनी पटवुन सांगितले. महात्मा जोतीराव यांनी १५० वर्षपूर्वी सत्यशोधक समाजाची स्थापना केली, छत्रपती शिवरायांच्या राजयभिषेक केलेला होता.त्या राजयभिषेकाला १०० वर्ष पूर्ण झालेले होते. त्याचे औचित्य साधुन महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती.

आपण जोतीराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून १५० दिवस झाले. त्या निमित्ताने गडीसुर्ला मध्ये सत्यशोधक दिवस सपन्न केला.

कार्यक्रमाचे संचालन सोनेरी ध्येय बहूउददेशिय संस्थाचे अध्यक्ष रोहित निकुरे यांनी केले. उपस्थित्यांचे आभारा निखिल कावळे यांनी मानले.