वाघाच्या हल्लयात महिला ठार

वनविकास महामंडळाच्या जंगलातील घटना

मूल (प्रतिनिधी) : कापुस काढण्यासाठी गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून जागीच ठार केल्याची घटना मूल तालुक्यातील जानाळा शेतशिवाराजवळील वनविकास महामंडळाच्या कक्ष क्रं. 523 मध्ये मंगळवारी दुपारी 3 वाजता दरम्यान घडली. श्रीमती कल्पणा अरूणा लोनबले वय 45 वर्षे रा. कांतापेठ असे वाघाच्या हल्लात ठार झालेल्या महिलेचे नांव आहे.

मूल तालुक्यातील मौजा कांतापेठ येथील श्रीमती कल्पणा अरूण लोनबले हया शेतावर कापुस काढण्यासाठी गेल्या होत्या, दरम्यान दबा धरून बसलेल्या वाघाने कल्पनाबाईवर हल्ला करून जागीच ठार केले. व शव वनविकास महामंडळाच्या कक्ष क्रं. 523 मध्ये नेले. सदर घटनेची माहिती होताच वनविकास महामंडळाचे सहा. व्यवस्थापक खामकर, वनपरिक्षेत्राधिकारी पिंजारी, मूल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतिशसिंह राजपुत, क्षेत्र सहा. राकेश कुमरे घटनास्थळी दाखल होवुन शव उत्तरीय तपासणीकरीता मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले.