सर्पदंशाने महिलेचा मुत्यु

मूल (प्रतिनिधी) : स्वयंपाक खोलीत काम करीत असताना विषारी सापाने दंश केल्याने एका महिलेचा मृत्यु झाल्याची घटना मूल तालुक्यातील उश्राळा येथे आज (ता. 17 नोव्हेंबर) रोजी दुपारच्या सुमारास घडली. भागरथाबाई मोतीराम शेरकी वय 65 वर्षे रा. उश्राळा असे सर्पदंशाने मृत्यू झालेल्या महिलेचे नांव आहे.

मूल तालुक्यातील मौजा उश्राळा येथील भागरथाबाई मोतीराम शेरकी हया घरातील स्वयंपाक खोलीत घरगुती काम करीत होत्या. दरम्यान काम करीत असताना सकाळी 10.30 वाजता दरम्यान विषारी सापाने दंश केल्याने त्यांना मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले, त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले. चंद्रपूर येथील वैद्यकीय अधिकाÚयांनी तपासणी करून मृत घोषीत करण्यात आले.