भाजपा कामगार मोर्चाच्या तालुकाध्यक्षपदी अनुप नेरलवार

मूल (प्रतिनिधी) : तालुक्यातील मारोडा भाजपाचे एकनिष्ठ कार्यकर्ते तथा ग्राम पंचायतचे उपसरपंच अनुप नेरलवार यांची भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाच्या मूल तालुकाध्यपदी निवड करण्यात आली. सदर निवड ही भाजपा कामगार मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश ताठे यांनी केली.

कामगाराच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत, मात्र कामगार असंघटीत असल्याने त्यांना न्याय मिळत आहे, यामुळे तालुक्यातील कामगारांच्या समस्या सोडवुन शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहचविण्याच्या दृष्टीने त्यांची निवड केली आहे, कामगाराचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्नरत असल्याचे अनुप नेरलवार यांनी निवडीवरून प्रतिक्रिया दिली.

अनुप नेरलवार याच्या निवडीबद्दल राज्याचे मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगडे, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अशिष देवतळे, भाजपाच्या मूल तालुकाध्यक्ष संध्याताई गुरूनुले, शहराध्यक्ष प्रभाकर भोयर, मूल नगर पालीकेचे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे, माजी सभापती प्रशांत समर्थ यांनी अभिनंदन केले.