अखेर तो वाघ जेरबंद #Tiger male

नागरीकांनी मानले वनविभागाचे आभार

ब्रम्हपूरी (प्रतिनिधी) : दक्षिण ब्रम्पुरी वनपरिक्षेत्रांतर्गत आवळगांव उपक्षेत्रातील शेतशिवरात धुमाकुळ घालणारा ज्ञ-4 वाघास जेरबंद करण्याचे आदेश मुख्य वन्यजीव रक्षक तथा प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी 25 ऑक्टोंबर रोजी दिले होते, सदर आदेशान्वये 21 नोव्हेंबर रोजी सदर वाघास वनविभागाने जेरबंद करण्यास यश आले आहे.#Brampuri

दक्षिण ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्रांतर्गत आवळगांव उपक्षेत्र / बांद्रा नियतक्षेत्रामध्ये कक्ष क्र. 1047 मध्ये पशुवैद्यकिय अधिकारी (वन्यजीव) आर आर टी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूरचे डॉ. रविकांत खोब्रागडे, आणि सशस्त्र पोलीस अजय मराठे यांनी ज्ञ-4 (नर) वाघास अचुक निशाना साधून सोमवारी सायंकाळी 6.45 वाजता डार्ट केला व सदर वाघ बेशुध्द झाल्यानंतर त्यास सायंकाळी 7.22 वाजता पिंज-यात सुरक्षितरित्या बंदिस्त केले. Safely enclosed in a cage

सदरची कार्यवाही ब्रम्पुरीचे सहायक वनसंरक्षक (तेंदू) के. आर. घोंडणे, दक्षिण ब्रम्हपुरीचे वनक्षेत्रपाल (प्रा.) आर. डी. शेंडे. आर आर टी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूरचे सदस्य बी. आर. दांडेकर, ए. एन. मोहुर्ले, एस. पी. नन्नावरे, ए. डी. तिखट, ए. डी. कोरपे, ए. एम. दांडेकर व फिल्ड बायोलॉजिस्ट राकेश अहुजा यांचे उपस्थितीत पार पडली.

जेरबंद करण्यात आलेल्या ज्ञ-4 वाघाचे (नर) वय अंदाजे दोन ते अडीच वर्षे असून त्याला पुढील तपासणीकरिता ट्रांझिट ट्रिटमेंट सेंटर, चंद्रपूर येथे स्थलांतरीत करण्यात येणार आहे.tiger male