गळफास लावून युवकाने केली आत्महत्या#suiside

सावली (प्रतिनिधी) : गावा लगतच्या बोळीत एका  युवकाने झाडाला फासी लावुन आत्महत्या केल्याची घटना आज बुधवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. निखिल हिवराज शेरकुरे वय २२ वर्ष असे मृतक युवकाचे नाव आहे.pathari police

मृतक निखिल हा पुणे येथील एका खाजगी कंपनीत रोजगाराला असुन मागील अकरा नोव्हेंबरला सुट्टी घेवुन तो गेवरा बुज येथील आपल्या घरी आला होता,दोन दिवसांपुर्वी परिसरातील नातेवाहीकां कडे भेटी करीता जावुन वापस गेवरा येथे परत आला व २५ नोहेंबरला पुणे येथे जाण्यासाठी तयारी केली, घरच्या आई वडीलांसोबत व्यवस्थीत बोलणे करुण सहज बाहेर जावुण येतो म्हणुन घरुन गेला.घरच्यांना कुठलीही भनक लागु न देता निखील गावाजवळील एका बोडी कडे गेला, व एका झाडाला गळफास लावुन आत्महत्या करुन घेत जिवन संपविले. काही वेळातच रस्त्याने जाणाऱ्या लोकांच्या दृष्टीस निखील झाडाला लटकलेल्या अवस्थेत दिसला.

घटनेची माहीती पाथरी पोलीसांना देण्यात आली, लगेच पाथरीचे साहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश मोहोड आपल्या पोलीस कर्मचारी मोहुर्ले. योगेश देशमुख यांचेसह घटनास्थळी पोहचले, घटनास्थळाचा पंचनामा करुन प्रेत ताब्यात घेत शवविच्छेदना साठी सावली ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.पुढील तपास पाथरी पोलीस करीत आहे.