अहिर यांची राष्ट्रीय ओबीसी आयोगाच्या अध्यक्षपदी निवड

मूल (प्रतिनिधी) : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांची राष्ट्रीय ओबीसी आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष साजरा केला जात आहे.

ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी वेगवेगळे पक्ष आणि संघटनाच्या माध्यमातुन मोठे आंदोलन करण्यात आले होते, यापाश्वभुमीवर भाजपाचे जेष्ठ नेते, माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी राष्ट्रीय ओबीसी आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने भाजपा कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

श्री. अहिर यांनी सन 1994 ते 1996 मध्ये महाराष्ट्र विधान परिषद सदस्य म्हणुन चांगली कारकिर्द राहीली आहे, यांच्या उल्लेखनिय कामाची दखल घेत, पक्षाने त्यांना चंद्रपूर लोकसभा निर्वाचन क्षेत्रातुन 11 व्या लोकसभेची तिकीट दिली, आणि ते निवडुण आले, त्यांनतर 2004 मध्ये पार पडलेल्या 14 व्या लोकसभा निवडणुक, 2009 मधील 15 व्या लोकसभा आणि 2014 मध्ये पार पडलेल्या 16 वी लोकसभा निवडणुकीत विजयी होवुन चांगले कार्य केले, दरम्यान 9 नोव्हेबर 2014 पासुन त्यांची केंद्रीय रसायन व उर्वरक राज्यमंत्री म्हणुनही कार्य केले आहे. त्यासोबतच केंद्रीय गृह राज्यमंत्री म्हणुनही उल्लेखनिय कार्य केले आहे.