वाघाच्या हल्यात महिला ठार#tiger attack

वाघाचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी

नागभीड (प्रतिनिधी) : शेतात काम करीत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने महिलेवर हल्ला करुन ठार केल्याची घटना नागभीड वनपरीक्षेत्रातील पाहर्णी बिटात आज शनिवारी सायंकाळी 5 वाजता दरम्यान घडली. वनिता वासुदेव कुंभारे वय 55 वर्षं असे वाघाच्या हल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. A woman was killed by a tiger

ब्रह्मपुरी उपविभागात मागील अनेक दिवसापासून वाघाचे हल्ले वाढले होते दरम्यान काही दिवसापूर्वी एका वाघाला वनविभागाने जेरबंद केले असताना आज शनिवारी सायंकाळी 5 वाजता दबा धरून बसलेल्या वाघाने पाहर्णी येथील वनिता वासुदेव कुंभारे वय 55 वर्षं ही जनावरासाठी शेतात गवत कापायला गेली असता वाघाने तिच्यावर हल्ला करुन ठार केले.Nagbhid renge tiger attack

घटनास्थळावर वनविभागाचे पथक दाखल झाले असून पंचनामा करीत आहे. वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करीत आहे.