उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडुन 50 लाखाची खंडणी मागणाऱ्याला केले जेरबंद

स्थानिक गुन्हे षाखेची कारवाई

चंद्रपूर (प्रतिनिधी) : एका महिलेसोबतचे बेडरूम मधील चित्रफित पाठवुन प्रसारीत करण्याची धमकी देवुन 3 लाख लुबाडणाऱ्या  टोळीचे समाधान झाले नाही, परत 50 लाखाची खंडणी मागणाऱ्या  एका टोळीला स्थानिक गुन्हे ‘ने जेरबंद केल्याची घटना मंगळवारी घडली यामुळे खळबळ माजली आहे.

चंद्रपूरातील एका उच्च पदस्थ अधिकाऱ्यानी जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे मंगळवारी तक्रार दिली, सदर तक्रारीत काही इसमानी संगणमत करून काही महिन्यापुर्वी फ्लॅटवर बोलवून एका महिलेसोबत बेडरूममध्ये छुपा कॅमेरा लावून चित्रफीत तयार केली आणि काही दिवसानी ती रेकॉर्ड केलेली चित्रफीत पाठवून प्रसारीत करण्याची धमकी देवून 3 लाख रूपयांची खंडणी उखळली. त्यानंतर पुन्हा खंडणी वसूल करण्याची लालसा निर्माण झाल्याने सदरची चित्रफीत एका अनोळखी इसमास पाठवून आणखी 50 लाखाच्या खंडणीची मागणी केली, अनोळखी इसमाने त्याचे मोबाईलवरून तक्रारदार यांना सदर चित्रफीतीचे स्क्रिनशॉट पाठवून ति चित्रफीत सामाजीक माध्यमावर प्रसारीत करण्याची धमकी देत होता. तक्रारदार याने पैसे नसल्याचे सांगीतल्याने अनोळखी इसम हा तक्रारदार यांचे कार्यालयात जावून तक्रारदार यांचेकडून 5 लाख रूपयाचा चेक व काही रोख रक्कमेची मागणी केली असल्याचे तक्रारीत नमुद केले होते, तक्रारीवरून पोलीस अधीक्षक यानी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना प्रकरणातील टोळीला जेरबंद करण्याचे आदेश दिले, स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि जितेंद्र बोबडे, मगेश भोयर संदिप कापडे, पोउपनि अतुल कावळे यांचे विशेष पथक तयार करण्यात आले. दरम्यान स्थानिक 29 नोव्हेंबर रोजी खंडणी मागणारा सादीक बॉन रसिक खान पठाण यास तक्रारदाराकडून 30 हजार रूपये रोख व 5 लाख रूपयाचा धनादेष घेत असताना रंगेहात पकडले, त्याची विचारपूस केली असता त्याने सादीक खान याच्या मैत्रीणीने तिथे मोबाईल वरून पाठविले व तिने त्यास संबधीत उच्च पदस्थ अधिका-यास पाठवून व मेटुन प्रसारीत करण्याची धमकी देवून पैशाची मागणी करण्यास सांगीतले यावरून सादीक खान, शिबल भारसाखरे व त्याच्या इतर तिन महिला आरोपीत साथीदारांविरूद्ध पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथे अपराध के 41 / 2022 कलम 384 385, 34 भादवी प्रमाणे खंडणीचा गुन्हा नोंद करण्यात आला.

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक रविंद्रसिंग संतोषसिंग परदेशी, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे, सहायक पोलीस निरीक्षक मंगेश भोयर, सहायक पोलीस निरीक्षक संदीप कापडे, पोउपनि अतुल कावळे, पोलीस अमलदार संजय आतकुलवार, प्रकाश यलकी प्रमोद डंबारे संतोश वेलमूलवार, कुंदन बावरी, नितीन रायपुरे, गोपाल आतकुलवार, नरेश डाहूले अजय बागेसर, भास्कर चिचवलकर महिला अंमलदार अपर्णा मानकर, निराशा तितरे, सोनाली पैन्दान यांनी केली.