जिल्हा परिषदेचे करारानामे ग्रामपंचायतच्या नावाने मात्र काम करणारे भलतेच

मूल तालुक्यातील प्रकार

मूल (प्रतिनिधी) : कोरोना काळात अनेक गावातील विकासकामे ठप्प पडलेली होती, मात्र फेब्रुवारी ते मार्च महिण्यापासुन जिल्हा परिषदेने अनेक कामाचे करारनामे तयार केलेले आहे, सदर करारनामे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडुन परस्पर दिल्या जात असल्याने, काम करणाऱ्यांनी ग्रामसेवकांना माहिती न देता बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना हाताशी घेवुन लेआऊट टाकत असल्याचा प्रकार समोर आला आहे. बांधकाम विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी कामाचे लेआऊट देताना ग्रामसेवकांना विश्वासात घेवुन दयावे असे त्यांना का वाटत नाही? याबाबत तर्कवितर्क लावल्या जात आहे.

मूल तालुक्यातील जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत अनेक कामे सुरू आहेत. ग्राम पंचायत मार्फत काही मर्जीतील कंत्राटदारांना कामे देवुन केली जाते, मात्र तालुक्यातील काही ग्राम पंचायतच्या ग्रामसेवकांनाच कामे सुरू असल्याची माहिती नसावी यापेक्षाही दुर्देव्य काय? असाच प्रकार नुकताच उघडकीस आला असुन सुमारे 9 लाखाचे काम एका ग्राम पंचायतच्या नावाने करारनामा झालेला आहे, तो काम एका व्यक्तीने सुरू केलेला आहे, मात्र तो काम तेथील ग्रामसेवकांनाच माहित नाही? याबाबत ग्रामसेवकांनी संबधीत अभियंत्याना कामाबाबत विचारले असता तो काम ग्राम पंचायत अंतर्गत सुरू असल्याचे सांगितल्याने त्यांनाही याबाबत आश्चर्य वाटले, असाच प्रकार काही गावात सुरू असावा अशी शंका काही नागरीकांनी व्यक्त केली आहे.

याबाबत जिल्हा परिषदेच्या एका शाखा अभियंताशी चर्चा केले असता त्यांनी करारानाम्याची सत्यप्रत आणुन दिल्यानंतर लेआऊट टाकुन देता येतो असे बेजबाबदार उत्तर त्यांच्याकडुन दिल्या जाते, यावरूनच मूलच्या जिल्हा परिषद बांधकाम विभागाचा बेजबाबदारपणा समोर आला असुन सदर कामाची चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.