गोवंशांची अवैध वाहतुक प्रकरर्णी दोघांवर गुन्हा दाखल

मूल पोलीसांची कारवाई 

मूल (प्रतिनिधी) : गोवंश जनावरांना पिकअप वाहनामध्ये कोंबुंन चंद्रपूरला नेत असताना मूल पोलीसांनी उपजिल्हा रूग्णालयाच्या टी पॉईंटवर नाकाबंदी करून पिकअप वाहनासह दोघांना ताब्यात घेवुन त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याची घटना मंगळवारी सकाळी 5.30 दरम्यान केली. इमरान इकबाल शेख वय 26 वर्षे रा. मूल वार्ड क्रं. 13 व अरबाज खान वहीद खान पठाण वय 22 वर्षे रा. मूल वार्ड क्रं. 11 असे आरोपीचे नांव आहे.

मूल पोलीसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून तपास पथकातील अधिकारी, कर्मचारी यांनी पंचासमक्ष मूल उपजिल्हा रूग्णालयाच्या टी पॉईंटवर नाकेबंदी केली, दरम्यान निळा रंगाची पिकअप वाहन क्रं. एम एच 33 टी 3255 दिसताच पोलीसांनी थांबवुन, सदर वाहनाची चौकशी केली असता त्याठिकाणी 8 गायी व 1 बैल असे 8 गोवंशीय जनावरे आढळुन आले, सदर जनावरांची किंमत 72 हजार, पिकअप वाहनाचे किंमत 5 लाख आणि आरोपी  वाहन चालक इमरान इकबाल शेख वय 26 वर्षे रा. मूल वार्ड क्रं. 13 व अरबाज खान वहीद खान पठाण वय 22 वर्षे रा. मूल वार्ड क्रं. 11 यांच्या ताब्यातील दोन अॅन्ड्राईड मोबाईल किंमत 14 हजार असा एकूण 5 लाख 84 हजार रूपयाचा मुददेमाल मिळून आल्याने पंचनामा कारवाई करून जप्त केला. पिकअप मधिल एकुण ०९ गोवंशीय जनावरांना सुरक्षिततेच्या दृष्टीने श्रीकृष्णा गोशाळा व सेवा संस्था, तोहेगांव ता गोंडपिपरी येथे दाखल करण्यात आले आहे.

सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी मल्लीकार्जून इंगळे, पोलीस निरीक्षक सतीशसिंह राजपूत यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम राठोड, नापोअं चिमाजी देवकते, शफिक शेख, संजय जुगनाके, श्रावण कुत्तरमारे यांनी केली. आरोपी विरूद्ध कलम ५, ५ (अ), ५ ( ब ) 9 महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा, सह कलम ११ (१) (ड) प्राण्यांना कुरतेने वागविण्यास प्रतिबंधक कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.