वाघाच्या हल्यात एक जण ठार

सावली वनपरिक्षेत्रातील घटना

सावली (प्रतिनिधी) : तालुक्यातील नीलसनी पेडगाव येथे वाघाच्या हल्ल्यात एक जण ठार झाल्याची घटना सावली वनपरिक्षेत्रात अंतर्गत येत असलेल्या उपक्षेत्र व्याहाड, नियतक्षेत्र सामदा, कक्ष क्रं 201 मध्ये मंगळवारी सायंकाळ च्या सुमारास घडली. कैलास लक्ष्मण गेडेकर (47) असे म्रुतकाचे नाव आहे.

तालुक्यातील मोठया प्रमाणावर जंगल व्याप्तपरिसर आहे. या परिसरात हिंस्र पशूंचा वावर आहे. निलसनी पेडगाव येथील कैलास लक्ष्मण गेडेकर वय 47 वर्षे हा आपल्या शेतात सरपण गोळा करण्यासाठी गेला होता. मात्र रात्रौ होवुन तो परत घरी न आल्याने कुटुंबियांनी व गावकऱ्यांनी शोधाशोध केली. आप्त नातेवाईकांकडे चौकशी केली. कुठेच पत्ता लागला नसल्याने (दि 7) च्या सकाळच्या सुमारास वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसह गावकऱ्यांनी जंगलामध्ये शोध घेतला असता कैलास चा मृतदेह जंगलात आढळून आला. शेतलगत असलेल्या झुडुपी जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाने कैलासवर हमला करून ठार केले व मृत्यदेह जंगलात फरफट नेला असल्याचे पंचनाम्या दरम्यान निष्पन्न झाले. दोन दिवसांपूर्वीच मृतकाच्या मुलीचा लग्न जुळणी चा कार्यक्रम पार पडला होता. घरातील कर्ता पुरुषच गेल्याने कुटुंबावर आघात झाला आहे. सावली वनविभागाने मृत्युदेहाचा पंचनामा करून सावली येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरिय तपासणी करीता पाठविले.

मृतकाच्या पश्च्यत पत्नी, एक मुलगा व मुलगी असा आप्त परिवार आहे. वनविभागाकडून मृतकाच्या कुटुंबास 25 हजार रुपयाची तात्काळ मदत देण्यात आली असून पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी विरूटकर यांच्या मार्गदर्शनात क्षेत्रसहाय्यक सूर्यवंशी, वनरक्षक सोनेकर करीत आहेत. वनविभागाने सदर वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.