विद्युत खांबावरून पडून एकाचा मृत्यू

चिमूर (प्रतिनिधी) : चिमूर नगर परीषद अंतर्गत विद्युत कंत्राटदार कंपनी कडे अस्थायी स्वरूपाचे काम करणारा कामगार सोनेगाव बेगडे येथील बस थांब्या जवळ दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास विद्युत खांबावर पथदिवे लावण्याचे काम करीत असतांना तोल जाऊन डोक्यावर त्यांचा मृत्यु झाला. चंद्रशेखर नन्नावरे वय 34 वर्ष रा. मालेवाडा असे मृतकाचे नाव आहे.

नगर परीषद क्षेत्रातील विद्युत दुरुस्ती, पथदिवे दुरुस्ती व देखभाल करण्याकरीता कंत्राट असणाऱ्या एनर्जी इफिसन्सी सर्वीस प्रा. लिमीटेड मुंबई या कंपनीकडे मालेवाडा येथील चंद्रशेखर नन्नावरे काही वर्षा पासुन काम करीत होता. चिमूर नगर परीषद क्षेत्रातील सोनेगाव बेगडे येथे पथदिवे दुरुस्ती व नविन लावण्याचे काम सुरु होते. चंद्रशेखर सोनेगाव बेगडे येथील बस थांब्या जवळील खांबावर चढुन काम करीत होता.अचानक त्याचा झुला घसरल्याने तो डोक्यावर जमिनीवर पडल्याने तो गंभीर जखमी झाला. सहकाऱ्यांनी त्याला उपचाराकरीता उप जिल्हा रुग्णालय चिमूर येथे दाखल केले. त्याच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचाराकरीता नागपूरला रेफर करण्यात आले .प्रवासा दरम्यान त्याचा मृत्यु झाला. शवविच्छेदना करीता चिमूर उपजिल्हा रुग्णांलयात आणण्यात आले. मृतकाच्या मागे पत्नी व एक मुलगा व मुलगी आहे.चंद्रशेखरच्या जाण्याने गावात व नगर परीषद क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.