राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अनिल देशमुख यांची जामिनावर सुटका

चंद्रपूर जिल्हयात आनंदोत्सव साजरा

चंद्रपूर (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामिन मिळल्याचा आनंद चंद्रपुर जिल्हात ठिकठिकानी साजरा करन्यात आला.

कथित १०० कोटी वसुली प्रकरणी मागील १३ महिन्यांपासून माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे तुरुंगात होते. गेल्या अनेक दिवसांपासून याप्रकरणी जामीन मिळावा म्हणून अनिल देशमुख प्रयत्न करत होते, मात्र न्यायालयाने या प्रकरणी निकाल राखून ठेवल्याने देशमुखांच्या जामिनावर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले होते. अनिल देशमुख यांना काही अटीशर्तींसह १ लाख रुपये इतक्या जातमुचलक्यावर न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. जामिन मंजुर झाल्याची बातमी जिल्हयात समजताच जिल्हातील राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये नवचैतन्य निर्माण झाले असुन राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ठिकाठिकाणी आनंदोत्सव साजरा केला व अनिल देशमुख आगे बडो हम तुम्हारे साथ है अश्या घोषणा देत जामिन मंजुर झालेच्या घटनेचे स्वागत करन्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रदेश प्रतिनिधी मुनाज शेख, तालुका अध्यक्ष सुधाकर रोहनकर, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष फयाज शेख, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष बंडु वनकर, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष रोहन कुटेमाटे, रोशन कोरेड्डीवार, राकेश किनेकर, अजय कावळे, ऐजाज पठान, शुभम बगडे, आमोल बडगे, ऐजाज अली, साहिल देवगडे, राकेश भुसारी, नौशाद अली, प्रमोद वावरे, संजय डोंगरे, कासिम पठान, आशिष लिपटे, अजय काका ,आोमकार पांडे, विजय कावळे उपस्थित होते

भद्रावती शहरातील भद्रनाग मंदीर परीसात राष्ट्रवादी कॉग्रेस तर्फे ढोल ताशाच्या गर्जात फटाके फोडुन व लाडुचे वाटप करून आनंद व्यक्त करन्यात आला. अनिल देशमुख यांना मिळालेला जामिन हा सत्याचा विजय असल्याचे मत यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रदेश प्रतिनिधि मुनाज शेख यानी व्यक्त केले.