चंद्रपूर गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरील उभ्या ट्रॅक्टरला धडक

एक जण  जागीच ठार

सावली (प्रतिनिधी) : चंद्रपुर गडचीरोली राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या सावली तालुक्यातील व्याहाड बुज येथे उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला दुचाकीने धडक दिल्याने दुचाकी स्वार जागीच ठार झाल्याची घटना सायंकाळी 6.30 वाजताच्या दरम्यान घडली. खुशाल माणीक वासेकर वय 32 वर्षे रा. व्याहाड बुज असे अपघातात ठार झालेल्या युवकांचे नाव आहे.

सावली तालुक्यातील व्याहाड बुज येथील खुशाल माणीक वासेकर वय 32 वर्षे हा गडचीरोली येथुन व्याहाड बुज. या स्वगावी परत येत असताना नंदीनी बार एंड रेस्टॉरंट समोर उभ्या असलेल्या ट्रॅक्टर क्रमांक एम एच 35 जी. 7665 या धानाचे पोते भरलेल्या धडक दिली. जोरदार धडक दील्याने एम एच 34 बी. वाय. 6141 या क्रमांकाचा दुचाकी चालक खुशाल वासेकर याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी व बराच आप्त परीवार आहे.