महामानवांचा आदर्श डोळयासमोर ठेवुन शैक्षणिक वाटचाल करावी : मंगेश पोटवार

सुभाष उच्च प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेहसंम्मेलन थाटात साजरा

मूल (प्रतिनिधी) : शिक्षण हे वाघीनीचे दुध आहे, जो पिणार तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असे उद्गार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काढले होते, त्यांचे आदर्श विद्यार्थ्यांनी डोळयासमोर ठेवुन पुढील शैक्षणिक वाटचाल करावी असे आवाहन दे धक्का एक्सप्रेसचे कार्यकारी संपादक तथा प्रकाशक मंगेश पोटवार यांनी केले. सुभाष उच्च प्राथमिक शाळा मूलच्या वतिने सांसकृतिक महोत्सवानिमीत्त आयोजीत उद्घाटनीय कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणुन बोलत होते.

महोत्सवाचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मोतीलाल टहलियानी यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक सचिव माणिकराव जगताप होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळा सल्लागार समितीचे अध्यक्ष प्रा. मारोतराव पुल्लावार, मूल नगर परिषदेचे माजी सभापती मिलिंद खोब्रागडे, महेंद्र करकाडे, येरगावचे माजी सरपंच रुमदेव गोहणे, पत्रकार विनायक रेकलवार , शाळेचे मुख्याध्यापक अविनाश जगताप, पदवीधर शिक्षक राजू गेडाम व पालक शिक्षक संघाचे सदस्य मंचावर उपस्थित होते.

यावेळी शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आपली कला नृत्याच्या माध्यमातुन सादर करून उपस्थितांची मने जिंकून घेतली. या महोत्सवाचे औचित्य साधून विद्यार्थ्याची कल्पकता वाढावी म्हणुन अंताक्षरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन मूल तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक येरमे यांच्या हस्ते पार पडले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती मूलचे माजी उपसभापती गजानन वलकेवार होते. विशेष अतिथी म्हणून प्रसिद्ध गायक संतोष कुमार तर प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार गुरू गुरूनुले, सामजिक कार्यकर्ते लोकनाथ नर्मलवार, माता पालक संघाचे सदस्य उपस्थित होते. यावेळी गायक संतोष कुमार यांनी विविध सदाबहार गिते गात अंताक्षरी स्पर्धेत भर घातली.

शाळेत आयोजीत विविध स्पर्धांचे बक्षिस वितरण समारंभ मूलचे तहसीलदार डॉ. रविंद्र होळी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्रा. मारोतराव पुल्लावार होते. प्रमुख पाहुणे म्हणून मूल विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष संदीप कारमवार, पब्लिक पंचनामाचे संपादक विजय सिध्दावार, मूल लाइव्ह न्यूज चॅनलचे अमित राऊत, माजी नगरसेविका विद्या बोबाटे, लिना बद्देलवार, भावना चौखुंडे, सोनु मस्के, मनीष येलट्टीवार, सचिन बल्लावार, संजय बद्देलवार आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

स्नेहसंमेलनाचे औचीत्य साधुन चित्रकला स्पर्धा, विज्ञान प्रदर्शनी, आनंद मेळावा व अंताक्षरी स्पर्धा आयोजित करण्यात आली. यावेळी विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह व बक्षिसे देवुन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन बंडू अल्लीवार, प्रस्ताविक मुख्याध्यापक अविनाश जगताप तर उपस्थितांचे आभार अजय राऊत यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक अंजली जगताप, राहूल मुंगमोडे, योगेश पुल्लकवार,. बंडु अल्लीवार, रीना मसराम, अजय राऊत, सुकेशिनी रामटेके, संध्या आभारे निखिता पोहनकर, चित्रा फलके, निशा जगताप, सुनीता ठाकरे, कीर्ती मोकासे आदींनी परिश्रम घेतले.