बोरचांदली येथे ग्रामीण क्रिडा दिवस उत्साहात साजरा

कृभको समुह ग्राम योजनेअंतर्गत विविध उपक्रम

मूल (प्रतिनिधी) : कृषी क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी कृषक भारती कोऑपरेटीव्ह लिमी. च्या वतिने समृह ग्राम योजनेअंतर्गत मूल तालुक्यातील बोरचांदली येथे ग्रामीण क्रिडा दिवस नुकताच पार पडला.

कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष संध्याताई गुरूनुले यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृभकोचे विभागीय व्यवस्थापक विपीन चव्हाण होते. प्रमुख पाहुणे म्हणुन आदर्श खरेदी विक्री सहकारी संस्था मर्या मूलचे अध्यक्ष पुरूषोत्तम भुरसे, बोरचांदलीच्या सरपंच ललीताताई सेमस्कार, उपसरपंच हरिभाऊ येनगंटीवार, पोलीस पाटील दशरथ मडावी, विदर्भ कोकण ग्रामीण बॅंकेचे व्यवस्थापक सुरेश कटकमवार, भादुर्णाचे माजी सरपंच संतोष रेगुंडवार उपस्थित होते.

कृषक भारती कोऑपरेटीव्ह सोयायटीच्या माध्यमातुन मौजा बोरचांदली हे गाव दत्तक घेतले आहे. सदर उपक्रमाअंतर्गत शेतकरी मेळावा, पशुचिकित्सा शिबीर व ग्राम स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. सदर उपक्रमांतर्गत दुधाळ जनावरांना तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली मोफत औषधोपचार करण्यात आले. ग्राम स्वच्छता अभियांनतर्गत केरकचरा संकलनासाठी कचरापेटी व झाडुचे वाटप करण्यात आले. ग्रामीण क्रिडा दिनानिमीत्य शाळकरी विद्यार्थी आणि युवक मंडळांना क्रिडा साहित्य वाटप करण्यात आले. वृक्षारोपन व पर्यावरण सवर्धनासाठी सुषमा अनिल कुंटावार यांचा यावेळी शाल श्रीफळ देवुन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे संचालन महेश कटकमवार यांनी केले तर उपस्थितांचे आभार जिल्हा व्यवस्थापक नेमा यांनी केले. कार्यक्रमाला ग्राम पंचायत सदस्य, नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.