व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतिने उद्या पत्रकार दिनाचे आयोजन

पञकार आरोग्य विमा प्रकल्पाचा मान्यवरांच्या हस्ते होणार शुभारंभ

चंद्रपूर (प्रतिनिधी) : स्थानिक व्हॉईस ऑफ मीडियाच्याच्या जिल्हा कार्यकारणी आणि चंद्रपूर शहर कार्यकारणीच्या वतिने 8 जानेवारी रोजी पत्रकार दिनाचे आयोजन हॉटेल सिध्दार्थ सभागृह, पोलीस मुख्यालयासमोर चंद्रपूर येथे आयोजीत केला आहे. सदर कार्यक्रमात पञकार आरोग्य विमा प्रकल्पाचा शुभारंभ मान्यवर मंडळींच्या हस्ते यावेळी करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार सुनील कुÚहीकर राहणार असुन जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. मुख्य अतिथी म्हणुन चंद्रपूरचे जिल्हा पोलीस अधिक्षक रविंद्रसिंग परदेशी, विभागीय वनअधिकारी प्रशांत खाडे, व्हॉईस ऑफ मीडीयाचे विभागीय अध्यक्ष मंगेश खाटीक, व्हॉईस ऑफ मिडीयाचे नागपूर जिल्हाध्यक्ष आनंद आंबेकर उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाचे औचित्य साधुन बल्लारपूरचे जेष्ठ पत्रकार वसंत खेडेकर, सावलीचे जेष्ठ पत्रकार यशवंत डोहणे, चंद्रपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष संजय तायडे, जेष्ठ पत्रकार गोपालकृष्ण मांडवकर यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाला पत्रकार बांधवानी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन व्हॉईस ऑफ मीडीयाचे जिल्हाध्यक्ष संजय पडोळे, चंद्रपूर शहर अध्यक्ष सारंग पांडे यांनी केले आहे.