उश्राळाच्या सरपंच आणि उपसरपंचानी पदभार स्विकारला

Ushrala Gram Panchayat
Ushrala Gram Panchayat

सरपंचपदी प्रियंका नर्मलवार तर उपसरपंचपदी उज्वला ढोले

मूल (प्रतिनिधी) : तालुक्यातील Ushrala Gram Panchayat उश्राळा ग्राम पंचायतच्या सरपंच प्रियंका नर्मलवार (Sarpanch Priyanka Normalwar) हया थेट जनतेतुन निवडुण आल्या आहेत, तर उपसरपंच पदाची निवडणुक आज (बुधवारी) ग्राम पंचायत कार्यालयात पार पडली यमाध्ये उज्वला तुषार ढोले (Ujwala Tushar Dhole) या अविरोध निवडुण आल्या, त्यानंतर सरपंच आणि उपसरपंच पदाचा पदभारही त्यांनी स्विकारला.

9 सदस्य संख्या असलेल्या उश्राळा ग्राम पंचायतची निवडणुक 18 डिसेंबर रोजी पार पडली, यानिवडणुकीत थेट सरपंच निवडुण दयायचे होते, यामध्ये प्रियंका लोकनाथ नर्मलवार हया बहुमताने निवडुन आल्या, आज (बुधवारी) उपसरपंच पदाची निवडणुक घेण्यात आली, यावेळी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन मूल तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार पृथ्वीराज साधनकर यांच्या उपस्थित पार पडली. यावेळी उपसरपंच पदासाठी उज्वला तुषार ढोले या एकमेव सदस्यांचा अर्ज आल्याने, त्यांना अविरोध उपसरपंच म्हणुन घोषीत करण्यात आले. यावेळी माजी सरपंच देवानंद नर्मलवार यांनी सरपंच प्रियंका लोकनाथ नर्मलवार आणि उपसरपंच उज्वला ढोले यांना पदभार दिला.

नवनियुक्त सरपंच, उपसरपंच यांचा माजी सरपंच देवानंद नर्मलवार, सामाजिक कार्यकर्ते लोकनाथ नर्मलवार, सदस्य विनोद जिवतोडे, माजी उपसरपंच तुषार ढोले यांच्यासह नागरीकांनी अभिनंदन केले.