ट्रॅक्टरची दुचाकीला धडक,1 जण जागीच ठार bike accident

A bike accident
A bike accident

चिमूर (प्रतिनिधी) : चिमूर-वरोरा राज्य महामार्गावर 12 जानेवारी च्या सायंकाळी 6 वाजताचा सुमारास खडसंगी येथून चिमूरकडे दुचाकी क्रमांक एम.एच.34/सी. सी.9205 या वाहनाने दोन युवक जात असतांना चिमूर Chimur  कडून वरोराकडे warora जाणारा ट्रॅक्टर क्रमांक एम.एच.34/एपी 5031या वाहनाने दुचाकीला जबर धडक दिली यात दुचाकीवर मागे बसलेला युवक खाली कोसळला व त्याच्या अंगावरून ट्रॅक्टर गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.देविदास शत्रुघ्न वाघमारे (35) वर्ष रा.पांढरवाणी असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. A tractor collided with a bike, 1 person died on the spot

फिर्यादी प्रशांत भास्कर नन्नावरे (30) वर्ष व देविदास शत्रुघ्न वाघमारे (35) वर्ष हे दोघेही मोटार सायकल क्र. एम एच 34/सीसी 9205 या वाहनाने खडसंगी येथून  चिमूर कडे येत असतांना लोखंडी पुलाजवळ समोरुन येणारा ट्रॅक्टर क्र. एम.एच.34 /ए.पी.5031 च्या चालकाने भरधाव वेगाने व निष्काळजीपणे ट्रॅक्टर चालवून अचानकपणे ब्रेक मारल्याने ट्रॅक्टरचे मुंडके डाव्या बाजुनी फिरुन फिर्यादीच्या दुचाकीला समोरुन धडक दिल्याने दुचाकीवर मागे बसून असलेला देविदास शत्रुघ्न वाघमारे हा टॅक्टरचे बाजुने खाली पडला व त्याच्या दोन्ही पायावरुन टॅक्टर गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.मृतक देवीदास ला मारण्यास टॅक्टर चालक कारणीभूत झाला अशी तोंडी फिर्याद प्रशांत यांनी दिली त्याच्या रिपोर्टवरुन चिमूर पोलिसांनी गुन्हा नोंद करून पोलीस निरीक्षक मनोज गभने यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना घेऊन घटनास्थळी भेट दिली व घटनेचा पंचनामा केला.आणि ट्रॅक्टरसह आरोपी नरेश पुंजीराम रोहनकर (31) वर्ष यास ताब्यात घेण्यात आले.या घटनेचा पुढील अधिक तपास चिमूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज गभने यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक फौजदार केशव गेडाम पोलीस करीत आहे. A case has been registered in Chimur Police Station