क्षयरोग रूग्णांना केले किटचे वाटप Kits distributed to TB patients

Kits distributed to TB patients
Kits distributed to TB patients

मूल (प्रतिनिधी) : रूग्णांची प्रतिकारशक्ती वाढुन रूग्ण लवकर बरे व्हावे यादृष्टीने श्री माता कन्यका सेवा संस्था चंद्रपूरआणि जिल्हयाचे पालकमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातुन मूल तालुक्यातील क्षयरोग रूग्णांना किटचे वाटप सोमवारी सकाळी करण्यात आले. Kits distributed to TB patients

मूल तालुक्यातील क्षयरोग रूग्णांची यादी प्राप्त करून श्री माता कन्यका सेवा संस्थानी मूल येथील भाजपा कार्यालयात अन्यधान्याची किट पाठविले होते, सदर यांदी नुसार मूल नगर पालीकेचे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे, माजी बांधकाम सभापती प्रशांत समर्थ आणि भाजपा कार्यकर्ते राकेश ठाकरे यांनी भाजपा कार्यालयात क्षयरोग रूग्णांच्या TB patients नातेवाहीकांना बोलावुन त्यांना किटचे वाटप केले.

सदर स्तुत्य उपक्रमाचे नागरीकांनी आणि रूग्णांच्या नातेवाहीकांनी क्षेत्राचे आमदार तथा जिल्हयाचे पालकमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार आणि श्री माता कन्यका सेवा संस्था चंद्रपूरच्या पदाधिकारी, संचालकाचे आभार मानले.