विद्यार्थ्यांच्या अभिनयाने पालकही भारावले

महिला मेळावा, आनंद मेळाव्याचेही आयोजन

गोंडपिपरी (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांमधील सुप्तकला गुणांना वाव मिळावा यासाठी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तारसा खुर्दच्या वतिने 10 फेब्रुवारी रोजी सांस्कृती कार्यक्रम, महिला मेळावा आणि आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, सदर सांस्कृतीक कार्यक्रमातील विद्यार्थ्यांच्या अभिनयाने यावेळी पालकही भारावले. Parents were also impressed with the performance of the students

कार्यक्रमाचे उद्घाटन शिवाजी महाविद्यालय विट्ठलवाडाचे सेवानिवृत्त प्राचार्य शभुजी येलेकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तारसा बुजचे सरपंच अजय भोयर होते. प्रमुख अतिथी म्हणुन तारसा बुजच्या उपसरपचं माधुरी येलेकर, ग्राम पंचायत सदस्य निकेश बोरकुटे, ग्राम पंचायत सदस्य ममता चोधरी, विभाताई चांदेकर, संध्या वासेकर, पोलीस पाटील सुरेश कुबडे आदी उपस्थित होते. Zilla Parishad Higher Primary School Tarsa Khurd

कोरोना काळात उत्कृष्ठ कार्य केल्या बद्दल विभाकर देवगडे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व गावकऱ्यांनी सहकार्य केले.