जि एस टी नंबर नसलेले बिल केले ग्राम पंचायतने मंजुर GST No
मूल (प्रतिनिधी) : शाळेला संगणक आणि प्रिंटर्स देण्यासाठी फिस्कुटी ग्राम पंचायतने Fiskuti Gram Panchayat जिल्हा निधीतुन सुमारे दोन लाख रूपये Swapnil स्वप्नील एटरप्रायजेसच्या नावाने काढलेले आहे, सदर निवीदा प्रक्रिया नियमाला डावलुन पार पाडली असुन जि एस टी नंबर नसलेले बिलही ग्राम पंचायतने मंजुर केले आहे. यामुळे सदर ग्राम पंचायतला शासनाचे नियम लागु नाही काय असा सवाल उपस्थित केला जात आहे. GST No
मूल तालुक्यातील फिस्कुटी ग्राम पंचायतला जिल्हा निधी अंतर्गत सन 2020-21 या आर्थीक वर्षात मोठया प्रमाणावर निधी मंजुर करण्यात करण्यात आला होता. दरम्यान 2 लाख रूपये निधी संगणक सुविधा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा फिस्कुटीला पुरविण्यासाठी मंजुर होते. त्यानिधीमधुन ग्राम पंचायतने कोठेशन बोलाविले, सदर कोटेशन बोलवितांना वृत्तपत्रात जाहिरात प्रकाषीत केली नाही, किंवा गव्र्हेमेंट ई मार्केट वरून निवीदा प्रक्रिया राबविली नाही, आणि बिना तारीख असलेले वरोरा येथील स्वप्नील एन्टरप्राईजने 1 लाख रूपये आणि घुग्गुस येथील वृंदा एन्टरप्राईजेसने 1 लाख 5 हजार आणि वसंत एंटरप्राइजेस यांनी 1 लाख 8 हजार रूपयेचा कोटेशन ग्राम पंचायतला दिलेला होता, त्यामधुन वरोरा येथील एन्टप्राईजचे कोटेशन मंजुर करून संगणक, प्रिंटर्स खरेदी केलेला आहे.
सुमारे 1 लाख रूपये किंमतीचे संगणक आणि प्रिंटर्सच्या बिलावर कुठेही जि एस टी चा उल्लेख नाही, संगणकामध्ये वापरण्यात हार्डडिस्क, रॅम्प व इतर साहित्याचा उल्लेख बिलात कुठेच नाही, केवळ 2 नग, प्रति नग 1 लाख रूपये, आणि एकुण 2 लाख रूपये लिहीले आहे, ग्राम पंचायत प्रशासनाला ही जि एस टी च्या बिलाची गरज वाटली नाही काय? असा प्रश्न यानिमीत्ताने उपस्थित होत आहे. करोडा रूपयाच्या निधीची विल्हेवाट अषाच पध्दतीने केली तर नाही ना अशीही शंका आता उपस्थित केली जात आहे.
याबाबत फिस्कुटी ग्रामपंचायतचे सचिव सचिन दांडेकर यांची भ्रमणध्वनी वरून प्रतिक्रीया घेण्याचा प्रयत्न केला मात्र होवु षकला नाही.