कापलेल्या चण्यावर डुक्करांनी मारला ताव Pigs munched on cut chickpeas

Pigs munched on cut chickpeas
Pigs munched on cut chickpeas

शेतकऱ्याची मोठी आर्थिक नुकसान

मूल (प्रतिनिधी) : बेरोजगारीवर मात करीत स्वतःच्या शेतावर चण्याचे पिक घेवुन रोजगार प्राप्त करणाऱ्या प्रशांत मेश्राम Prashant Meshram यांच्या शेतातील कापलेल्या चण्यावर डुक्करांनी ताव मारल्याने हजारो रूपयाचे नुकसान झालेले आहे. Thousands of rupees have been lost due to pigs attacking the cut chickpeas in the field.

मूल तालुक्यातील मौजा मारोडा Maroda  येथील प्रशांत मेश्राम यांनी अडीच एकर शेतात चण्याची लागवड केली होती, दोन दिवसापुर्वी काढणीला आलेले चण्याचे पीक त्यांनी कापून ठेवले होते. दरम्यान रात्रौच्या वेळेस डुक्कराच्या कळपाणे संपूर्ण चणा फस्त केला आहे.. श्री. मेश्राम यांच्या जवळपास 20 क्विंटल चण्याच्या पिकाची नुकसान झाली असून शेतकऱ्याला मोठ्या आर्थिक नुकसानीला समोरे जावे लागले आहे. यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी चणाचे पीक घेऊन त्यातून आर्थिक नफा मिळविण्याचा प्रयत्न केलेला असतानाच वन्यप्राण्याकडुन अशा प्रकारचे नुकसान होत असल्याने वन्यप्राण्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.

आधीच आर्थिक तंगीत असलेल्या शेतकऱ्याच्या हातातोंडात आलेला पिक वन्यप्राणी खाऊन नासाडी करीत असल्यामुळे शेतकरी संकटात सापडत आहेत.  वनविभागाने Forest Department तात्काळ पचनामा करून आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्याने व्यक्त केली आहे.