चिमढाच्या नागरीकांची पाण्यासाठी भटकंती Plight of citizens for water

chimdha
chimdha

पाणी पुरवठा करणाऱ्या पाईप लाईनच्या गळतीवर महिलांची झुंबळ

मूल (प्रतिनिधी) : 24 गावासाठी तयार करण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेचे पाणी गावापर्यंत पोहचत नसल्याने चिमढा Chimdha  येथील महिलाना पाण्यासाठी कोसो दुर जावुन पाण्याची तहाण भागवावी लागत असल्याने महाराष्ट्र जिवन प्राधीकरण विभागाप्रती नागरीकांमध्ये रोष व्यक्त केल्या जात आहे. Maharashtra Life Authorization Department

करोडो रूपये खर्च करून महाराष्ट्र जिवन प्राधिकरण विभागामार्फत मूल तालुक्यातील सुमारे 24 गावांसाठी मुख्यंमत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम अंतर्गत 24 गावे मूल ग्रीड पाणी पुरवठा योजना 15 ऑक्टोंबर 2021 रोजी कार्यान्वित करण्यात आली. सदर योजनेचे पाणी चिमढा वासियांना काही दिवस सुरळीत पुरवठा करण्यात आले मात्र काही दिवसातच पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यात जिवन प्राधिकरण विभागाला अपयश येत आहे. 24 Villages Mul Grid Water Supply Scheme under Chief Minister Rural Drinking Water Programme

सुमारे 65 हजार लिटर क्षमतेची पाणी पुरवठा करणारी पाण्याची टाकी सन 2020-21 मध्ये लाखो रूपये खर्च करून चिमढा येथे पुर्ण करण्यात आली आहे, मात्र मागील काही दिवसापासुन नागरीकांना पाणी पुरवठा होत नसल्याने अनेक महिला टेकाडी गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईल लाईनच्या गळतीतील पाणी नेऊन आपली तहाण भागवित असल्याचे दिसुन येत आहे. सदर पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेचे पाणी नागरीकांना सुरळीत पुरवठा करावा अशी मागणी नागरीक करीत आहे.

तात्काळ पाणी पुरवठा करा अन्यथा आदोलन करू: योगेश लेनगुरे
चिमढा येथील नागरीकांना मागील अनेक दिवसापासुन पाणी पुरवठा केला जात नसल्याने महाराष्ट्र जिवन प्राधिकरण उपविभाग मूलच्या अधिकाऱ्याशी चर्चा करून तात्काळ सुरळीत पाणी पुरवठा करण्याची मागणी केली आहे, पाणी पुरवठा सुरळीत सुरू न केल्यास गावकऱ्याना घेवुन महाराष्ट्र जिवन प्राधिकरण उपविभागाच्या कार्यालयात आंदोलन करू अशी प्रतिक्रिया चिमढा ग्राम पंचायतचे उपसरपंच योगेश लेनगुरे यांनी दिली.

2 दिवसात सुरळीत पाणी पुरवठा करू: उपविभागीय अभियंता वि. सो. उध्दरवार
24 गावे मूल ग्रीड पाणी पुरवठा योजनेच्या चितेगांव येथील वॉलचे काम सुरू असल्यामुळे चिमढा आणि काही गावाला कमी पाणी पुरवठा होत आहे, काम अंतिम टप्पात असुन 2 दिवसात सुरळीत पाणी पुरवठा करू अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र जिवन प्राधिकरण उपविभाग मूलचे उपविभागीय अभियंता वि. सो. उध्दरवार यांनी दिली.