रानटी डुक्कराच्या हल्यात युवक जखमी Youth injured in wild boar attack

Youth injured in wild boar attack
Youth injured in wild boar attack

मिरची तोडताना रानटी डुक्कराचा हल्ला

बल्लारपूर (प्रतिनिधी) : कोठारी वनपरिक्षेत्र Kothari forest area अंतर्गत येणाऱ्या हरणपायली नियत क्षेत्रातील शेतात शेतकरी व शेतमजूर मिरची तोडण्याचे काम करीत असताना दबा धरून बसलेल्या रानटी डुक्कराच्या हल्यात युवक गंभीर जखमी झाला. जखमी युवकाचे नाव गोलू कमलाकर पारेलवार (21) Golu Kamlakar Parelwar असून त्यास तात्काळ कोठारी आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. डॉ. देवगडे Dr. Devagade यांनी त्याचेवर प्राथमिक उपचार करून जखमी युवकाची प्रकृती चिंताजनक वाटल्याने ताबडतोब त्यास रुग्णवाहिकेतून जिल्हा ग्रामीण रुग्णालयात रेफर करण्यात आले.

घटनेची माहिती वनपरिक्षेत्राच्या वनाधिकारी सुरेखा मुरकुटे यांना देण्यात आली. सदर घटनेची दखल घेत क्षेत्रसहायक पेदापेलीवार, वनरक्षक श्याम यादव व इतर करमचऱ्यांच्या ताफ्यासह आरोग्य केंद्र गाठले. क्षेत्र सहाय्यक पेदापेलीवार यांनी मोकापंचनामा केला आहे.