विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने युवा शेतकऱ्याचा मृत्यू Young farmer dies due to electric shock

Madhukar Mahadev Asutkar
Madhukar Mahadev Asutkar

सोयाबीन पिकाच्या संरक्षणासाठी लावला होता विद्युत प्रवाह

भद्रावती (प्रतिनिधी) : तालुक्यातील देऊरवाडा-माजरी रस्त्यावरील शेतात पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा हिस्त्र प्राण्यासाठी लावलेल्या विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना आज बुधवारी पहाटे आठच्या दरम्यान घडली. मधुकर महादेव आसुटकर Madhukar Mahadev Asutkar वय ४0 वर्षे रा. देऊरवाडा असे विजेच्या धक्क्यात मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. Young farmer dies due to electric shock

देऊळवाडा . मांजरी रस्त्यावर मधुकर आसुटकर यांची शेती आहे त्या शेतीला लागून असलेली राजूरकर यांची शेती ठेका पद्धतीने केली, तिथे सोयाबीन पिकाची दुबारा पेरणी केली होती त्या पिकाला पाणी देण्यासाठी ते नेहमीच पहाटे जात होता. या पिकांच्या संरक्षणासाठी रानटीहिस्त्र जनावरांच्या बंदोबस्तासाठी शेतातील जिवंत विद्युत प्रवाहाचे तारे लावून ठेवत होता. घटनेच्या दिवशी पहाटे शेतावर गेल्यावर तो प्रवाह बंद करण्याचा त्याला विसर झाल्याने त्या प्रवाहाच्या धक्क्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

मृतकाची पत्नी वारंवार फोन करत असल्याने मधुकर फोन का उचलत नाही म्हणून ती शेताकडे गेली असता हा प्रकार उघडकीस आला घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहे.