पत्रकार परिषदेत आरोप
मूल (प्रतिनिधी) : सरकार विरोधात आवाज उठविणारे कॉग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करणाऱ्या हुकुमशाही सरकारकडुन लोकशाहीची हत्या केली जात असुन हा प्रकार निदनिय असुन तालुका कॉंग्रेस कमेटीच्या वतिने सदर प्रकाराचा निषेध करण्यात येत आल्याची माहिती मूल तालुका कॉंग्रेस कमेटीचे तालुकाध्यक्ष गुरूदास गुरनुले यांनी पत्रकार परिषदेत दिली. Cancellation of Rahul Gandhi’s Lok Sabha membership is tantamount to murdering democracy : Congress taluka president Gurudas Gurnule
मूल येथील दर्पण सार्वजनिक वाचनालयात आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना श्री. गुरनुले यांनी म्हणाले की कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा संपुर्ण भारतभर भ्रमण केलेली आहे. यामुळे कॉंग्रेस पक्ष दिवसेंदिवस वाढत असल्याने, त्याची भिती विरोधी पक्षाना असल्याने राहुल गांधी यांचे विरोधात अनेक ठिकाणी खोटे खटले दाखल करण्याचे कटकारस्थान केन्द्र सरकार चालविले आहे. अशा एका जुन्या प्रकरणात .राहुल गांधी यांना गुजरात न्यायालयाने शिक्षा सुनावताना त्यांना एक महिण्यात अपील करण्याची संधी दिली असतांना वरिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाची प्रतिक्षा न करता दबावतंत्राचा वापर करून दुसऱ्याच दिवशी राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्य पदावरून निष्काषीत केले. आणि शासकीय बंगला खाली करण्याची नोटीस दिली ही तातडीची कारवाई करण्यासाठी एवढी घाई का सुटली हे न उपचडणारे कोडे असून लोकशाहीची हत्या करून हुुकुमशाहीकडे वाटचाल करीत असल्याचे दिसून येत आहे. देशातील जनतेला जाणीव असून, केन्द्र सरकारला जनता कधीही माफ करणार नाही,
देशातील वाढती महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्याच्या आत्महत्या, खाजगीकरणाच्या विरोधात लढा देण्यासाठी राहुलजी गांधी यांना समर्थन आणि त्याचे हात मजबुत करण्यासाठी हुकुमशाही केन्द्र सरकारचा मूल तालुका काँग्रेस कमेटी महिला कॉंग्रेस कमेटी शहर कॉंग्रेस कमेटी युवक कॉंग्रेस कमेटीच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला आहे.
पत्रकार परिषदेला चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत, तालुका कॉंग्रेस कमेटीचे तालुकाध्यक्ष गुरूदास गुरनुले, मूल नगर पालीकेचे माजी उपाध्यक्ष तथा कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस राकेश रत्नावार, माजी तालुकाध्यक्ष घनश्याम येनुरकर, शहराध्यक्ष सुनिल शेरकी, महिला तालुकाध्यक्ष रूपाली संतोषवार, युवक तालुकाध्यक्ष पवन निलमवार, विविध कार्यकारी सहकारी संस्था मूलचे अध्यक्ष संदिप कारमवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक किशोर घडसे, बेंबाळ येथील कॉंग्रेसचे युवा नेते प्रशांत उराडे, शामलता बेलसरे, वैशाली काळे यासह कॉंग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.