डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला शिक्षीकांची दांडी Teacher absent on Dr. Ambedkar Jayanti

Teacher absent on Dr. Ambedkar Jayanti
Teacher absent on Dr. Ambedkar Jayanti

मुख्याध्यापकांनी केली संवर्ग विकास अधिकाऱ्याकडे तक्रार 

मूल (प्रतिनिधी) :  शासन निर्देशानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती शासकीय स्तरावर साजरी करण्याचे निर्देश असतानाही मूल येथील जिल्हा परिषद मुलांची प्राथमिक शाळेतील Zilla Parishad Boys’ Primary School, Mul कार्यरत शिक्षीकांनी, शाळेत आयोजीत केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला गैरहजर राहील्याने, याबाबत खुलासा सादर करण्याचे आदेश शाळेच्या मुख्याध्यापकांनी संबधीत शिक्षीकांना दिले असुन संवर्ग विकास अधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी यांनाही पत्र पाठविल्याने शैक्षणिक वर्तुळात खळबळ माजली आहे. Teacher absent on Dr. Ambedkar Jayanti

Teacher absent on Dr. Ambedkar Jayanti1

Teacher absent on Dr. Ambedkar Jayanti1मूल येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत महेश रामटेके हे मुख्याध्यापक म्हणुन कार्यरत आहेत, तर सहा. शिक्षक म्हणुन कु. अल्का बुरांडे, कु. निलिमा कुंळबे आणि कु. सपना वेलादी कार्यरत आहेत. शासन परिपत्रक क्रं. जपुती – 2022/प्र. क्रं. 120 कार्या. 29, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई दि. 18 जानेवारी 2023 नुसार डॉ. आंबेडकर जयंती शासकीय सतरावर सजरी करण्याचे निेर्दश आहेत. त्यानुसार शाळेच्या मुख्याध्यापकांनी 13 एप्रिल रोजी नोटीसव्दारे कार्यरत शिक्षकांना माहिती देण्यात आली. याबाबत विद्यार्थ्यांनाही माहिती देण्याचे निर्देशही दिले होते मात्र सदर शिक्षकांकडुन विद्यार्थ्यांना सुट्टी असल्याचे सांगीतल्याने विद्यार्थ्यांना सदर कार्यकमापासुन वंिचत राहावे लागते.

सदर प्रकार गंभीर असुन शालेय शिस्तीला धरून नसल्याने कारवाई का करण्यात येवु नये याबाबतची मुख्याध्यापकांनी नोटीस बजावली असुन 24 तासाचे आत खुलासा सादर करण्याचे आदेश बहाल करण्यात आले आहे. सदर तक्रारीची प्रत संवर्ग विकास अधिकारी यांचेकडे देण्यात आले आहे..

चौकशी करून कारवाई करू : गटशिक्षणाधिकारी वैभव खांडरे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मूल येथील शिक्षीका डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला गैरहजर असल्याची माहिती मिळाली आहे मात्र अजुनपर्यंत तक्राराची प्रत मला मिळाली नाही, तक्रारीची प्रत मिळाल्यास तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करून कारवाई करू अशी प्रतिक्रीया मूल पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी वैभव खांडरे यांनी दिली.