चोरटयांनी बियरच्या 21 पेटयांवर मारला ताव Thieves stole 21 boxes of beer

Thieves stole 21 boxes of beer
Thieves stole 21 boxes of beer

मूल तालुक्यातील घटना : देशी दारू दुकानात चोरी

मूल (प्रतिनिधी) : तालुक्यातील राजकीय दृष्ट्या अति संवेदनशील समजल्या जाणाऱ्या भेजगाव Bhejgaon येथे सरपंच अखिल गांगर्डेवार यांच्या मालकीच्या न्यू देशी दारू दुकानात अज्ञातांनी रविवारच्या रात्री मागच्या बाजूने लोखंडी ग्रील कटरने कापून दरोडा टाकला. Thieves stole 21 boxes of beer

यात चोरट्याने 21 पेट्या बियर तर एक देशी दारूची पेटी तर जवळपास पाच हजार रुपये रोख असे 85000 चा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला. आज सोमवारला सकाळी देशी दारू दुकानाचे दिवाणजी अमोल अर्जुन शेंडे यांनी सकाळी सात वाजता देशी दारू दुकान उघडण्याकरिता गेले असता बाहेरचे सेटर जैसे थे असून आतील रुमच्या दरवाजाला कुलूपच नसल्याने इतरत्र पाहणी केली असता मागच्या खिडकीचा ग्रील कटरने कापून दिसला. तर आतील सामान असता व्यस्त दिसल्याने लगेच त्यांनी ही घटना मालक अखिल गांगरेड्डिवार यांना कळविली.

देशी दारू दुकानाचे मालक अखिल विलास गांगरेडीवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुल पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहिती होताच मुल उपविभागीय पोलीस अधिकारी मल्लिकार्जुन इंगळे व पोलीस निरीक्षक सुमित परतेकी आपल्या ताफ्यासह घटनास्थळी भेट देत घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी चंद्रपूर वरून ठसा तंत्रज्ञ व डॉग च्या साह्याने तपास केला गेला. घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मल्लिकार्जुन इंगळे व पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम राठोड यांनी आपल्या सहकार्यासह तपास करीत आहेत.