तालुका कृषी अधिकारी पोहचले थेट युवा प्रयोगशील शेतकऱ्याच्या बांधावर Young experimental farmers

Cultivation of banana crop
Cultivation of banana crop

शेतकऱ्यानी केली केळी पीकाची लागवड Cultivation of banana crop

सावली (प्रतिनिधी) : तालुक्यातील विहिरगाव येथील एका युवा शेतकऱ्याने पारंपरिक धान पीक पद्धतीला फाटा देत पिक बदलाचा साहसी निर्णय घेवुन दोन एकर जमीनीवर केळी पीक लागवड Cultivation of banana crop केली असुन या युवा शेतकऱ्याने तालुक्यातील शेतकऱ्यासमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे. Young experimental farmers

याप्रयोगाची दखल घेत केळी बागेची पाहणी व पीक सल्ला देण्यासाठी सावली तालुका कृषी अधिकारी अश्विनी गोडसे Ashwini Godse आपल्या चमू सोबत थेट बांधावर पोहचल्या. त्यांच्यासोबत कृषी पर्यवेक्षक पानसे, कृषी सहाय्यक योगेश टेकाडे व मुंबई अर्थशास्त्र विद्यापीठाचे क्षेत्रीय समन्वयक दिलीप फुलबांधे हे उपस्थित होते.

समीर रुखमा विलास घरत हे या युवा शेतकऱ्याचे नाव असुन शेतीचा पुर्वानुभव नसलेला, दहावी नंतर मशिनिस्ट शाखेचे पॉलिटेक्नीकचे तांत्रीक शिक्षण घेतल्यानंतर नोकरीच्या मागे न लागता शेती क्षेत्रातुन व्यवसायाच्या संधी उपलब्धतेचा शोध घेत असतांनाच मुंबई अर्थशास्त्र व सार्वजनिक धोरण संस्था मुंबई विद्यापीठाचे अधिकाऱ्यासोबत संपर्क झाला, मार्गदर्शनाने केळी पीकाची निवड करुन जैन टिशु कल्चर पध्दतीने तयार केलेल्या २५०० रोपांची लावणी केली, पारंपरिक धान पीक लागवडीत लागवड खर्च अधिक व उत्पादन सारखेच असल्यामुळे धाडसी निर्णय घेतला असल्याचे भेटी दरम्यान सांगितले, न परवडणाऱ्या धान पिकात बदल करुन व्यावसायीक दृष्टीकोन बाळगुन नगदी पिकाचा स्विकार केल्यास शेतक-यांचा कायापालट होवु शकतो अशा आशावाद या युवा शेतकऱ्याच म्हणणे आहे.