बस-दुचाकीच्या अपघातात दोघे ठार Two killed in the accident

Two killed in the accident
Two killed in the accident

बसही गेली नाल्यात 

राजुरा (प्रतिनिधी) : राजुरा ते गडचांदूर Rajura-Gadchandur महामार्गावर बस आणि दुचाकीच्या भीषण अपघातात दुचाकीचालक व त्याच्या मागे बसलेल्या इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. पांढरपौनी Pandharpoini जवळील नाल्याजवळ झालेल्या अपघातात एन.एन.ग्लोबल कोल वॉशरीज येथील संदिप सिंह Sandip sinh वय 31 वर्ष व अन्य एक कामगार दुचाकीवर जात असताना राजुरा येथुन पालगाव कडे जाणाऱ्या बस क्र. एमएच 07 सी 9538 या बसच्या जोरदार धडकेत या दोन्ही दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला. Two killed in the accident

मिळालेल्या माहितीनुसार ही बस राजूराहून गड़चांदुर कडे जात असताना पांढरपौनी जवळील नाल्याजवळ बस आणि दुचाकीत धडक झाली. या धडकीत बस रास्ता सोडून नाल्यात गेली. या धडकेत दोन्ही दुचाकीस्वार जागीच गतप्राण झाले. मात्र बस मधील प्रवासी सुरक्षित असुन प्रवाश्याना कोणतीही दुखापत झाली नाही. घटनेची माहिती कळताच गावकऱ्यांनी मदतीकरिता घटनास्थळी धाव घेत पोलिसांना अपघाताची माहिती दिली. अधिक तपास सुरू आहे.