जिल्हा कृषी अधीक्षकांची युवा शेतकरी सुमित समर्थ यांच्या फळबागेला भेट Orchard

Orchard
Orchard

मुल (प्रतिनिधी ) : तालुक्यातील फिस्कुटी-विरई येथील आधुनिक प्रयोगशील युवा शेतकरी सुमीत समर्थ ह्यांनी मुरमाळ व गोटाळ असलेल्या शेतीतील जागेत पारंपरिक शेत पिकाला बाजूला सारून तालुक्यातला नवीन प्रयोग म्हणुन उत्कृष्ठरित्या आधुनिक जर्मन टेक्नॉलाजी पद्धतीने मोठ्या स्वरूपात सव्वा बारा एकरात तालुका कृषी अधिकारी कार्यालय मूल ह्यांच्या मार्गदर्शनात तब्बल ४५०० झाडांची लागवड करून नवयुवकात आदर्श निर्माण करण्याचा यशस्वी प्रयत्न केला करिता जिल्हा कृषी अधीक्षक भाऊसाहेब बऱ्हाटे, तालुका कृषी अधिकारी भास्कर गायकवाड, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता चंदन चौरासिया, कृषि सहाय्यक के .पी डोंगरे, कृषि पर्यवेक्षक राठोड यांनी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. District Agriculture Superintendent visited the orchard of young farmer Sumit Samarth

सदर फळबाग मोठ्या प्रमाणात लागवडीत १००० आंबा झाडे, सीताफळ ११००, चिकू ६००, फणस ५००, पेरू 8००, निंबू ५००, नारड २५० झाडांची लागवड केली आहे. ह्याशिवाय प्रायोगिक तत्वावर शेवगा, ड्रगणफ्रूट, अननस, स्ट्राबेरी, अंजीर, स्टारफ्रूट, लिची, अंगूर, मोसंबी, संत्र, वॉटर अॅपल, डाळिंब, आवळा, चेरी, रामफळ, खजूर, काजू ह्या प्रकारे २9 प्रकारचे फलबाग लागवड करून सदर प्रयोग यशस्वी करण्याचे प्रयत्न सुरू आहे. फलबागेच्या व्यतिरिक्त मच्छीपालन, नैसर्गिक पद्धतीने गावठी कोंबडी पालन, साहिवाल गाय पालन, कंपोस्ट खत प्रोजेक्ट हयाप्रकारे अनोख्या पद्धतीने शेतीला जोड धंदा व पूरक व्यवसाय म्हणुन प्रयत्न सुरू करणार आहेत एकंदरीत सदर संपूर्ण प्रयोग २० एकरात असून भविष्यात मोठ्या स्वरूपात ग्रामीण संस्कृतिनि नटलेला आगळावेगळा कृषी पर्यटन उभारण्याचा मानस असल्याचा सुमीत समर्थ ह्यांनी सांगितले .

सदर लागवडीत १०० टक्के रोपे जगवलेली, बाग एकदम हिरवीगार व अपेक्षेपेक्षा कमी वेळात योग्य वाढ, योग्य खत पानी व्यवस्थापन तसेच संपूर्ण शेत तणविरहीत बघून जिल्हा कृषी अधीक्षक ह्यांनी सदर बाग फुलवणारे सुमीत समर्थ ह्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन जिल्हा व तालुका कृषि विभागाकडून जमेल तेवढे मार्गदर्शन व सहकार्य लाभ मिळवून देण्याचे आश्वासन दिले . जेणेकरून जास्तीत जास्त युवा वर्ग शेतीकडे वळून शेत व्यवसायात बळकटी येईल