टेकाडी परिसरात वाघ, बिबटयाचा धुमाकूळ Terror of tiger, leopard

tiger, leopard
tiger, leopard

वनविभागाचे जाणिवपुर्वक दुर्लक्ष

मूल (प्रतिनिधी) : गेल्या महिण्याभरापासुन वाघ आणि बिबटयाने टेकाडी परिसरात धुमाकूळ घातला असुन जवळपास 10 शेळया आणि 3 कुत्र्यांना फस्त केले असतानाही वनविभाग त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. वाघ आणि बिबटयाचा त्वरीत बंदोबस्त करावा अन्यथा वनविभागाच्या कार्यालयासमोरच आंदोलन करू असा इशारा गावकऱ्यानी दिला आहे. Terror of tiger, leopard in Tekadi area

सावली वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत येत असलेल्या मूल तालुक्यातील मौजा टेकाडी परिसरात गेल्या अनेक महिण्यापासुन वाघ आणि बिबटयांचा धुमाकूळ सुरूच आहे, याबाबत गावकऱ्यानी वनाधिकाऱ्याना माहिती देवुनही याकडे दुर्लक्ष करीत असल्याने वनविभागाप्रती नागरीकांनी तिव्र रोष व्यक्त करीत आहे. गेल्या महिणाभरात टेकाडी येथील विलास गोहणे यांची 1 शेळी, नत्थु भोयर यांच्या 4 शेळया, अंबादास जराते यांचा 1 बकऱ्यावर वाघ, बिबटयाने हल्ला करून ठार केले आहे. त्यानंतर काही दिवसातच विलास गोहणे यांच्या शेळीवरही बिबटयाने हल्ला केला मात्र ती थोडक्यात बचावली. यापुर्वीही टेकाडी येथील अनेकांच्या जनावरांवर वाघ, बिबटयाने हल्ला करून ठार केल्याची घटना घडली आहे.

मूल येथील इंजि. किशोर कापगते यांच्या टेकाडी येथील शेतावर असलेली लॅब्रा जातीच्या कुत्र्याला बिबटयाने ठार केले. मंगेश पोटवार यांच्या इरा फार्म हाऊस मधील लॅब्रा जातीचे आणि लॅब्रा क्रास असलेले दोन कुत्रे बिबटयाने फस्त केल्याने हजारो रूपयाचे नुकसान झालेले आहे. वारंवार होणाऱ्या घटनांमुळे गावकरी दहशतीत जिवन जगत असुन वनविभागाने वाघ आणि बिबटयांचा त्वरीत बंदोबस्त करावा अशी मागणी नागरीकांनी केली आहे अन्यथा गावकऱ्यामार्फत तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

बिबटयाला पकडण्यासाठी पिंजरे लावु: वनपरिक्षेत्राधिकारी पी. जी. विरूडकर
सावली वनपरिक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या टेकाडी परिसरात बिबटयाकडुन शेळयांवर हल्ले होत आहे, बिबटयाचा बंदोबस्त करण्यासाठी आठ दिवसांपुर्वी एक पिंजरा लावण्यात आलेला आहे, गुरूवारी परत एक पिंजरा लावुन बिबटयाला पकडु अशी प्रतिक्रिया सावलीचे वनपरिक्षेत्राधिकारी पी. जी. विरूडकर यांनी दिली.