माजी मंत्री शोभाताई फडणवीसांना मोठा धक्का Shobhatai Fadnavis

Press conference Avinash Jagtap
Press conference Avinash Jagtap

माजी तालुकाध्यक्ष अविनाश जगताप सह कार्यकर्ते सुधीरभाऊंच्या खेम्मात

मूल (प्रतिनिधी) : गेल्या 25 वर्षापासुन माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपाचे सक्र्रिय कार्यकर्ता म्हणुन काम करीत असतानाच भाजपाचे मूल तालुकाध्यक्ष म्हणुन उत्तम कार्य केलेले आहे, मात्र गेल्या काही दिवसांपासुन आम्हा कार्यकर्त्यांना डावलण्याचा प्रयत्न भाजपाच्या जेष्ठ नेत्या शोभाताई फडणवीस यांचे कडुन होत असल्याने माझेसह कार्यकर्त्यांनी शोभाताईपासुन दुर होत जिल्हाचे पालकमंत्री नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार Minister Namdar Sudhir Mungantwar यांच्यासोबत राहुन भारतीय जनता पक्षाचे काम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचनिमीत्याने येत्या 23 जुन रोजी सुधीरभाऊ मुनगंटीवार मित्र परिवाराच्या वतिने सुधीरभाऊंचा नागरी सत्कार समारंभाचे आयोजन केले असल्याची माहिती भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष अविनाश जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली. Shobhatai Fadnavis

आकापूर येथील जगताप फार्म हाऊस येथे आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेला मूल पंचायत समितीचे माजी उपसभापती अमोल पाटील चुधरी, गजानन वल्केवार, सामाजिक कार्यकर्ते लोकनाथ नर्मलवार, भाजपाच्या ओबीसी सेलचे नेते प्रशांत बोबाटे, संजय मारकवार, अविनाश वरगंटीवार, हेमंत कोमलवार, विपीन भालेराव यांचेसह सुधीरभाऊ मित्र परिवाराचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Press conference Avinash Jagtap1
Press conference Avinash Jagtap1

चंद्रपूर येथील मातोश्री वृध्दाश्रमाच्या कार्यकमानिमीत्य आम्ही मेहनत घेवुन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केलो, मात्र कार्यक्रमाच्या एक दिवसाआधी रात्रौ 10 वाजता आमचे पासेस रद्द करण्यात आले, याबाबत आम्ही शोभाताईना भ्रमणध्वनी केला मात्र त्यांनी एका कार्यकर्त्याकडे आपले भ्रमणध्वनी दिल्याने आम्हाला कार्यक्रमात सहभागी होता आले नाही, तेव्हापासुनच शोभाताई आम्हा कार्यकर्त्यांची अवहेलना करीत असल्याने शेवटी नाईलाजास्तव आम्हाला शोभाताईपासुन दुर होत सुधीरभाऊंच्या नेतृत्वात भाजपाचे काम करण्याचा निर्णय घेतला आहे. (Akapur) Mul

जिल्हयाचे पालकमंत्री तथा राज्याचे मंत्री म्हणुन काम करीत असताना सुधीरभाऊनी न भुतो न भविष्यती असे विकास कामे केली असुन त्यांच्या सोबत काम करण्याची मला आणि कार्यकर्त्यांना मनातुन इच्छा आहे, यामुळे सुधीरभाऊंची भेट घेवुन मूल शहरात नागरी सत्काराचा कार्यक्रम आयोजीत करण्याचा प्रस्ताव त्यांच्यापुढे मांडताच त्यांनी 23 जुन रोजी घेण्यास सांगीतले आहे. त्यानुसार कार्यक्रमाच्या तयारीला कार्यकर्ते लागले असल्याची माहिती अविनाश जगताप यांनी दिली.

सुधीरभाऊ मुनगंटीवार मित्र परिवाराच्या वतिने नागरी सत्काराचा कार्यक्रम आयोजीत केला असला तरी 23 जुन नंतर आम्ही भाजपाचे कार्यकर्ते म्हणुन कुठलीही अपेक्षा न ठेवता आम्ही भाजपाचे काम करणार आहोत, भाजपा पदाधिकाÚयांनी दिलेले आदेश आम्ही पाडु असेही अविनाश जगताप यांनी सांगितले.

नामदार मुनगटीवार यांनी आम्हा कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवुन नागरी सत्कार सभारंभाला येण्याचे आश्वासन दिले, त्याबद्दल सुधीरभाऊ मुनगंटीवार मित्र परिवाराच्या वतिने आभार व्यक्त केले.

भाजपाच्या नेष्ठ नेत्या, माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांच्या नेतृत्वात सलग तिन टर्म भाजपाचे तालुकाध्यक्ष म्हणुन काम केलेल्या अविनाश जगताप यांनी तळकाफडकी शोभाताईंची साथ सोडुन भाऊच्या पंगतीत गेल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अविनाश जगताप हे शोभाताईंचे अतिशय विश्वासु कार्यकर्ते म्हणुन ओळखले जात होतेे, मात्र त्यांनी अचानक शोभाताईची साथ सोडल्याने शोभाताईच्या समर्थकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.