बांबू तोडण्यासाठी गेलेल्या इसमाचा जंगलात आढळला मृतदेह A body found in the forest

A body found in the forest
A body found in the forest

गोंडपीपरील तालुक्यातील गोजोली येथील घटना

धाबा (प्रतिनिधी) : मध्यचांदा वनविभागाअंतर्गत येत असलेल्या धाबा वनपरिक्षेत्रातिल कक्ष क्रमांक १५१ मध्ये एका ६५ वर्षीय इसमाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.A body found in the forest

गोंडपीपरी तालुक्यातील गोजोली येथील सुधाकर शेडमाके आज सकाळ च्या सुमारास शेतात गेले होते. शेतीची पाहणी करून लगत असलेल्या जंगलात बांबू तोडत असताना अचानक त्याचा मृत्यू झाला. याचदरम्यान धाबा वन परिक्षेत्रातिल कक्ष क्रमांक १५१ मध्ये वनअधीकारी गस्तीवर असतांना त्यांना एका इसमाचा मृतदेह आढळला. घटनेची माहिती धाबा उपपोलीस स्टेशनला देण्यात आली. लागलीच पोलीस व इतर वन कर्मचारीयासह गावकरी घटनास्थळी हजर झाले. मृतदेहाची पाहणी केली असता सदर मृत व्यक्ती सुधाकर शेडमाके वय ६५ वर्ष रा.गोजोली येथील असल्याचे समजून आले.
घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून मृतकाचा मृतदेह गोंडपीपरि येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरणीय तपासणी पाठविण्यात आले.पुढील तपास पोलीस करीत आहेत.